Viral video of alleged stone pelting on a train turns out to be old footage of a WAG-12 freight locomotive, not India’s hydrogen train. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

Truth About Hydrogen Train Viral Video In India: व्हायरल व्हिडिओत हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक झाल्याचा दावा केला जात होता. मात्र रेल्वेच्या स्पष्टीकरणानुसार हा व्हिडिओ जुन्या घटनेचा असून ट्रेन WAG-12 लोकोमोटिव्हची आहे. सीजेपी आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

Sandeep Chavan

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेन स्टेशनवर येत असताना दिसतेय...त्याचवेळी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांवर जाऊन काहीजण ट्रेनवर दगडफेक करतायत...

हे दगडफेक करणारे CJPचे आंदोलक असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आंदोलकांनी हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक केलीय का...?

दिल्लीतील आंदोलनानंतर आता अनेक व्हिडिओ व्हायरल केले जातायत...आता ट्रेनवर झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय...ही ट्रेन भारताची पहिली स्वदेशी 'हायड्रोजन ट्रेन' असून कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा केलाय...पण, खरंच हे आंदोलक सीजेपीचे समर्थक आहेत का...? हा व्हिडिओ खरंच दिल्लीतील आंदोलनातील आहे का...? ही दगडफेकीची घटना कधी घडली आणि ती हायड्रोजन ट्रेन होती का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी रेल्वेने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण जारी केलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हिडिओत दिसत असलेली ट्रेन हायड्रोजन ट्रेन नाही

WAG-12 लोकोमोटिव्हने चालवली जाणारी मालगाडी

व्हायरल व्हिडिओचा CJP आंदोलनाशी संबंध नाही

CJP आंदोलकांनी ट्रेनवर दगडफेक केलेली नाही

व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुन्या घटनेतील

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओत दिसणारा इंजिनचा भाग हा 'WAG-12' इलेक्ट्रिक फ्रेट लोकोमोटिव्ह आहे...हायड्रोजन ट्रेनचा हा व्हिडिओ नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत CJPच्या आंदोलकांनी पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक केल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

SCROLL FOR NEXT