Rescue operation underway after a boat capsized at Kaptai Lake in Bangladesh; viral video falsely linked to Alibaug Saam Tv
व्हायरल न्यूज

अलिबागच्या समुद्रात उलटली प्रवासी बोट? कुणी लपवला अपघाताचा व्हिडिओ?

Fact Check: आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्य समोर आणतो...आता अलिबागच्या समुद्रात प्रवासी बोट उलटल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच अलिबागच्या समुद्रात अपघात झालाय का...? एवढा मोठ्या अपघाताचा व्हिडिओ कुणी लपवला...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

खोल समुद्रात बोट उलटतानाचा हा व्हिडिओ आता समोर आलाय...हा व्हिडिओ अलिबागमधील प्रवासी बोटीच्या अपघाताचा असल्याचा दावा करण्यात आलाय...हा अपघात भीषण आहे...बोटीतून काही प्रवासी जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत...या बोटीत लहान मुलंही आहेत...त्यांनाही वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे...अर्धी बोट पाण्यात बुडालीय...पण, खरंच हा अपघात अलिबागचा आहे का...? एवढा मोठा अपघात झाला तर मग बातमी का आली नाही...? अपघाताची माहिती लपवण्यात आली का...? हा प्रवाशांचा जीवाचा प्रश्न असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...

अलिबागमधील बोटींचा रंग हा वेगळा आहे...अशा बोटी अलिबाग मुंबई प्रवासात वापरल्या जात नाहीत...आणि प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते...हा व्हिडिओ बांगालदेशातील असून, दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता...मात्र, सोशल मीडियावर अलिबागच्या नावाने व्हायरल होत असल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली...आम्ही याची पडताळणी केली असता, अलिबागमध्ये बोटीचा अपघात झाल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

SCROLL FOR NEXT