Cash bundles recovered from a hidden compartment in a car during an ED raid, falsely linked to Ram Temple theft in viral claims. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Truth Behind Viral Cash Video: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता राम मंदिरातील चोरीची कोट्यवधींची रोकड कारमध्ये सापडल्याचा दावा करण्यात आलाय...तसा व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच राम मंदिर चोरी प्रकरणातील नोटा सापडल्याचा हा व्हिडिओ आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

गाडीमध्ये एक खास कप्पा तयार करून लपवलेली ही रोकड आता बाहेर काढली जातेय...राम मंदिरातून चोरलेले हे पैसे गाडीत लपवून ठेवल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून, राम मंदिरातून चोरलेले पैसे सापडले असे मेसेज व्हायरल केले जातायत...पण, खरंच हा व्हिडिओ राम मंदिर चोरी प्रकरणातील आहे का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...

...हा व्हिडिओ बघा, सगळ्या 500 रुपयांच्या नोटा आहेत...बंडलच्या बंडलं गाडीतील बाहेर काढले जातायत...पोलीस गाडीतून पैसे बाहेर काढतायत...तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त रोकड असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच ही रोकड अयोध्येतल्या राम मंदिरातील आहे का...? हा व्हिडिओ कुठला आहे...? आणि हा व्हिडिओ कधीचा आहे...? आरोपींनी रोकड गाडीत लपवून ठेवली होती का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...आम्ही व्हायरल होत असलेला व्हिडिओ नीट पाहिला...गुगल की वर्डनुसार फ्रेम तपासून पाहिल्या...त्यावेळी आमच्या पडताळणी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल व्हिडिओतील कारमधील रोकडचा चोरीची नाही

या व्हिडिओचा राम मंदिर चोरीशी संबंध नाही

कारमधून रोकड जप्त केल्याचा व्हिडिओ छत्तीसगडमधील

व्हायरल व्हिडिओ 2025 साली कारवाईचा

तर राम मंदिरातील वस्तू चोरी प्रकरणात एफआयआर 25 जून 2026 रोजी नोंदवण्यात आला...त्यामुळे या व्हिडिओचा आणि राम मंदिरातील चोरीचा काहीही संबंध नाही...हा व्हिडिओ ईडी कारवाईचा आहे...एका सरकारी अधिकाऱ्याच्या इनोव्हा कारमधून तब्बल 1 कोटी 66 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय...पैसे लपवण्यासाठी कारमध्ये गुप्त कप्प्यातून नोटांचे बंडल ठेवले होते...राम मंदिरात चोरी झाली हे खरं आहे...त्यातील आरोपींना अटकही झालीय...मात्र, व्हिडिओ अजून पुढे आलेला नाही...त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातेय...त्यामुळे असे व्हिडिओ पाहून यावर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT