Delhi Metro Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: आधी धक्काबुक्की मग बोलबच्चन; दिल्ली मेट्रोत २ महिलांमध्ये तुफान राडा, VIDEO व्हायरल

Viral Video: दिल्ली मेट्रोतील रोज नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात डान्स, गाण्यांचे, भांडणाचे व्हिडिओ असतात. असाच दोन महिलांचा जागेवरुन भांडतानाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Fight Viral Video:

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा अड्डा असे म्हणायला हरकत नाही. दिल्ली मेट्रोतील प्रेमवीरांचे, भांडणाचे किंवा काहीतरी विचित्र घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोतील भांडणाचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोत महिलांची अगदी लहान-सहान कारणांवरुन भांडणे होताना दिसतात. आता पुन्हा एकदा दोन महिलांची सीटवरुन भांडणे झाली आहेत. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

व्हायरल व्हिडिओत एक महिला दरवाजाच्या बाजूला उभी आहे. या महिलेची सीटवर बसलेल्या दुसऱ्या महिलेशी भांडण होते. व्हिडिओत सर्वप्रथम त्यांच्यात सीटवरुन शाब्दिक भांडणे होताना दिसत आहेत. त्यानंतर अचानक सीटवर बसलेली महिला उठून उभ्या असलेल्या महिलेला मारते. त्यानंतर त्या दोघींमध्ये खूप जोरात भांडण होते. त्यानंतर त्या दोघींमध्ये मारामारी होती. एकमेकींच्या अंगावर धावून जात त्यांच्यात मारामारी होते. ही भांडणे सुरू असताना तिथे असलेल्या महिला या दोघींची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर ती महिला दुसऱ्या महिलेचा व्हिडिओ काढते आणि धमकी देताना दिसत आहे. तुझा हा व्हिडिओ पोलिसात देईल, अशी धमकी त्या महिलेने दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ghar Ke Kalesh या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हे तर आता रोजचंच झालं आहे, दिल्ली मेट्रोत बायकांची भांडणे काही नवीन नाही, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Close : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी, रेड अलर्टमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT