Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : कोर्टाबाहेर दोन गटात दे-दणादण! पुरुषांचा धोबीपछाड डाव, महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंज्या, पाहा व्हिडीओ

Nashik Viral Video : नाशिकमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik News : नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. घरगुती वादातून मारामारी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भांडणामध्ये पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर हा प्रकार घडला आहे. घरातल्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पुरुषांसह महिलांदेखील भिडल्या. मारामारीमध्ये पुरुष एकमेकांनी उचलून फेकत होते. हातांनी, पायांनी मारहाण करत होते. तर महिला कपडे, केस ओढत होत्या.

न्यायालयासमोर घडलेला प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अचानक हाणामारी सुरु झाल्याने तेथील लोक पहिल्यांदा दचकले. त्यानंतर भांडणात काहींना उडी घेतली आणि दोन्ही गटातील सदस्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मधस्थीनंतर भांडणारे लोक अधिक त्वेषाने समोरच्यांना मारहाण करु लागले.

घडलेला प्रकारामुळे लोकांची मोठी गर्दी झाल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस मध्यस्थी करत असतानाही दोन्ही गटातले लोक शिव्या देत होते. दरम्यान बरेचसे लोक मध्यस्थी ऐवजी मोबाईलमध्ये भांडणाचा, हाणामारीचा प्रकार कैद करण्यासाठी जमले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT