LORD SHIVA VIRAL VIDEO FACT CHECK saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: आकाशात दिसले महादेव? व्हिडिओमागचं सत्य काय?

Viral Cloud Formation Resembling Lord Shiva: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आकाशात महादेव दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...नटराजच्या रुपात महादेव प्रकटल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आकाशात महादेव दिसले का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

Sandeep Chavan

सोशल मीडियावर सध्या महादेवाची नटराज रूपासारखी दिसणारी ढगांची एक अद्भुत प्रतिमा प्रचंड व्हायरल होतेय...सूर्योदयाच्या सोनेरी प्रकाशात आकाशातील ढगांनी जणू महादेवाने नटराज रूपधारण केल्याचा भास होतो...एका बाजूला उगवता सूर्य आणि त्याच्या तेजस्वी किरणांच्या पार्श्वभूमीवर दिसणारी ही आकृती पाहून सगळेच आश्चर्यचकित झालेयत...

व्हिडिओ पाहून महादेव भक्तांना आनंद झालाय...ते व्हिडिओ व्हायरल करून म्हणतायत की, महादेव आकाशात दिसलेयत...या व्हिडिओत महादेव हात पसरून नृत्य करत असल्यासारखे दिसत असून, निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याची अनुभूती मिळत आहे... आकाशात इंद्रधनुष्य दिसतं तशाच प्रकारे महादेव पाहायला मिळतायत...पण, खरंच आकाशात महादेव दिसले का...? हा व्हिडिओ खरा असेल तर तो कुठला आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...हा व्हिडिओ नीट तपासून पाहिला...तसेच या व्हिडिओची अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने सायबर एक्सपर्टला व्हिडिओ दाखवला... आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

महादेवाचा नटराज रूपासारखा दिसणारा व्हिडिओ खोटा

AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यात आला

खोटे व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल

महादेवाची नटराज रूपासारखा दिसणारा व्हिडिओ खरा नाहीये...

महादेवाचे भक्त लाखोंच्या संख्येनं आहेत... त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल केले जातात... यामुळे भक्तही व्हिडिओ शेअर करतात...मात्र, आमच्या पडताळणीत आकाशात महादेव दिसल्याचा व्हिडिओ असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदी करताय सावधान! हॉलमार्क सोनंही बोगस असू शकतं

महाराष्ट्रातील प्रसिद्ध हास्यकलाकाराचं निधन; नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा

दादांची नाक रगडून माफी मागा; उद्धव ठाकरेंचा शाहांना टोला, पुतळ्याच्या अनावरणावरून राजकारण तापलं

MBBSसाठी NEETसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे? अनेक राज्यांचा निलेकणी समितीकडे प्रस्ताव

Maharashtra News Live Update: मायक्रो फायनान्सच्या एजंटची मुजोरी!

SCROLL FOR NEXT