Elephant Rescues Tiger in Flood saam tv
व्हायरल न्यूज

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Elephant Rescues Tiger in Flood : सध्या सोशल मीडियावर एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. एका बाजूला माणूस माणसाचा वैरी बनत चालला असताना, प्राण्यांमधील अथांग प्रेमाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय.पुरात वाघ फसलाय आणि त्याच्या मदतीला हत्ती धावून आल्याचं या व्हिडिओत दिसतंय.हत्तीने वाघाला आपल्या पाठीवर घेतल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय.त्यामुळे हत्तीने वाघाला वाचवल्याचा हा व्हिडिओ कुठला आहे? याचीच उत्सुकता अनेकांना लागलीय.

Sandeep Chavan

हा व्हिडिओ इंडोनेशियातील सुमात्रा येथील असल्याचा दावा केलाय.पुराच्या भीषण आणि वेगवान प्रवाहात हा वाघ अडकलाय, त्याला वाचवण्यासाठी हत्ती देवदूतासारखा धावून येतो आणि आपल्या सोंडेनं वाघाला आपल्या पाठीवर बसवून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतोय.अनेक युजर्स 'माणसांपेक्षा प्राणीच जास्त संवेदनशील असतात' असं कॅप्शन लिहून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.त्यामुळे आम्हीही हा व्हिडिओ कुठला आहे.? याचा शोध घेतला.व्हिडिओ नक्की कुठला आहे याची माहिती तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली.त्यावेळी यामागचं सत्य काय समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य

हत्ती वाघाला वाचवतानाचा व्हिडिओ AI निर्मित

व्हायरल व्हिडिओ कोणत्याही खऱ्या घटनेचा नाही

इंडोनेशियात अशी कोणतीही घटना घडलेली नाही

तंत्रज्ञानानं आज इतकी प्रगती केली आहे की, डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेलच असं नाही. सोशल मीडियावर भावनिक करणाऱ्या किंवा आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्की तपासा.इंडोनेशियातील सुमात्रा येथील हत्ती आणि वाघाचा हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे.त्यामुळे आमच्या पडताळणीत हत्तीने वाघाला वाचवल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर, सरपंच थेट कलेक्टरला नडला

पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या कोणते आहेत पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT