A real Indian Rock Python spotted at Koyna Dam, Satara, amid viral video claims. Saam Tv
व्हायरल न्यूज

कोयना धरणात फिरतायत महाकाय अजगर? भल्या मोठ्या अजगरांमुळे दहशत?

Koyna Dam Viral Python Video Fact Check: कोयना धरणात 30 फूट अजगर फिरत असल्याचा व्हायरल दावा कितपत खरा आहे? साम टीव्हीच्या व्हायरल सत्य तपासणीत समोर आलं नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण सत्य.

Omkar Sonawane

आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो. आता कोयना धरणात अॅनाकोंडा फिरत असल्याचा असा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालीय... पण खरंच कोयना धरणात महाकाय अजगर आहेत का? याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ?

हाच आहे तो व्हिडीओ... कोयना धरणात तब्बल 30 फूटांचे अजगर फिरतायत असा दावा करण्यात आलाय... या अजगरांपासून स्थानिकांंसह पर्यटकांना धोका असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय...पण व्हिडिओत दिसत असलेला हा अजगर कोयना धरणातलाच आहे का...? एवढा मोठा 30 फूटांचा अजगर असतो का...? हा विषय लोकांच्या सुरक्षेचा असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...

या व्हिडिओत पाण्यात भला मोठा अजगर दिसतोय..

साताऱ्यातील कोयना धरणात हा अजगर असल्याचा दावा करण्यात आलाय.. त्यामुळे

दहशतीचे वातावरण निर्माण झालंय.. एवढा मोठा अजगर असल्याने तो माणसावरही हल्ला करू शकतो अशी भीती आहे . अंगाचा थरकाप उडेल एवढा मोठा हा अजगर आहे...

पण खरंच कोयना धरणात असे भले मोठे अजगर फिरतायेत का.? व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा खरंच कोयना धरणातला आहे का..? व्हिडिओ खऱ्या अजगराचा आहे की एआय मार्फत बनवण्यात आलाय...? हा विषय पर्यटक आणि स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती सर्पमित्र आणि वन अधिकारी यांच्याकडून मिळवली...

10 फूट लांबीचा अजगर कोयना धरणात आढळला

इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा हा अजगर

अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं

पर्यटकांना अजगरांपासून कोणताही धोका नाही

हा व्हिडिओ खऱ्या अजगराचाच आहे. वन अधिकाऱ्यांनी या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलंय...जर तुम्हाला अशा प्रकारे भला मोठा अजगर दिसल्यास घाबरू नका, वन अधिकारी किंवा सर्प मित्रांची संपर्क करा.. कोयना धरणात फिरत असलेला अजगराचा व्हिडिओ हा खरा असून आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'कोरियन लव्ह गेम'चा जीवघेणा विळखा, तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या

महायुतीत वादाची ठिणगी, तुमचा मुख्यमंत्री 242 आमदारांमुळे

UNDER 19 क्रिकेटमध्ये भारताचा डंका, विजेत्यापासून एक पाऊल दूर

अजित पवारांचा अपघात की घातपात? लवकरच 'तो' रिपोर्ट समोर येणार, VIDEO

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा, कोणत्या अटींमुळे रखडलं विलिनीकरण?

SCROLL FOR NEXT