Bird Flying With Shark in Claws Saaam Tv
व्हायरल न्यूज

Shark Hunting Viral Video: पक्षाने चक्क 'शार्क'ची केली शिकार, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

Bird Hunts Shark Viral Video: पक्षाने चक्क 'शार्क'ची केली शिकार, व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

Satish Kengar

Bird Flying With Shark in Claws: इंटरनेटवर कधी कोणता व्हिडीओ समोर येईल, हे सांगता येत नाही. यातील अनेक व्हिडीओ हृदयाला भिडून जातात. तर काही व्हिडीओ चकित करणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका पक्षाने चक्क शार्क माशाची शिकार केल्याचं दिसतंय. या शॉकिंग व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर एक मोठा शिकारी पक्षी एका माशाला आपल्या धारदार पंज्यात पकडताना दिसत आहे, जे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही थक्क झाले.

तुम्ही आजवर शिकारीच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला शिकारीचा जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो काहीसा वेगळा आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. (Latest Marathi News)

हा व्हिडीओ अमेरिकेतील मर्टल बीचचा आहे. जिथे एक पक्षी मोठ्या माशाला पंज्यात धरून हवेत उडत होता. हा व्हिडीओ पाहून काही लोक या मोठ्या माशाला छोटा शार्क म्हणत आहेत. हा व्हिडीओ २०२० चा आहे. अमेरिकेतील टेनेसी येथील अॅशले व्हाईटने हे दृश्य कॅमेरात कैद केले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. केवळ २५ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 4.3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. तर ३३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT