Grandma Breakup Motivation Advice Saam Tv
व्हायरल न्यूज

Breakup Motivation Advice Video: ब्रेकअपमुळे दु:खी होती मुलगी, आजीने दिला असा सल्ला; ऐकून व्हाल थक्क!

Satish Kengar

After Breakup How to Move On: जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याच्यासाठी त्याचा जोडीदार जगातील सर्वात खास व्यक्ती असतो. त्याच्या अनेक उणिवा असल्या तरी त्याची सोबत नेहमी हवीहवीशी वाटते. त्या व्यक्तीसोबत आयुष्यातील प्रत्येक आनंद वाटून घ्यावासा वाटतो.

मात्र तोच व्यक्ती तुमची फसवणूक करत असेल किंवा तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही नैराश्येत बुडून जाता. ब्रेकपनंतर जगातील प्रत्येक आनंद व्यर्थ वाटतं. हे दुःख सहन करणं फार कठीण होऊन जातं.

पण ब्रेकअपचं दु:ख मनातून काढून टाकलं तर तुम्ही आनंदी राहून स्वत:साठी एक चांगला जोडीदार निवडू शकता. अनेक लोकांसाठी हे करणे खूप कठीण आहे. याशीच संबंधित एक व्हिडीओ (viral video) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांना ब्रेकअपचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. या व्हिडीओमध्ये (viral video) एक आजी आपल्या नातशी बोलत असल्याचे दिसत आहे. जिचं ब्रेकअप झालं असून त्यामुळे ती निराश आहे.  (Latest Marathi News)

आजी आपल्या नातला समजावत आहे की, ''ज्याच्याशी ब्रेकअप झालं त्याचा विषय सोड. एक गेला तर दुसरा येईल आयुष्यात. त्याहूनही चांगला येईल. दु:खी का व्हायचं? का उगाच वेळ वाया घालवायचा.'' आजी म्हणते, '''एकच आयुष्य मिळालं आहे. ते असं वाया का घालवायचं. सुखी राहा, दुसरा शोध.'' आजींचा हा सल्ला लोकांना खूप आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि आजीचे कौतुक करत आहेत. (viral video)

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर kamakaaziiii नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. लोक व्हिडीओवर कमेंट करून आजीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले, ''मलाही अशी आजी हवी आहे.'' दुसर्‍या युजरने लिहिले, ''इतका आत्मविश्वास हवा आहे.'' (viral video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT