Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: 70 वर्षांच्या शांताबाईचा जबरदस्त कॅटवॉक; आजीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडल्या

Shantabai Catwalk Video Viral: बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी अनेक अभिनेत्री सुरुवातीला मॉडलिंग करतात. त्यानंतर त्यांना चित्रपटांची ऑफर मिळते. आजवर तुम्ही अनेक अभिनेत्रींना मॉडलिंग

Ruchika Jadhav

Grandmother Catwalk On Shantabai Song:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी गोष्टी व्हायरल होतात. यात डान्सचे व्हिडिओ तर सर्वांनाच आवडतात. मजा मस्ती आणि मनासारखं आयुष्य जगायला वयाचं काही बंधन नसतं. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजीने केलेल्या कलेसमोर टॉपच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्यात असं नेटकरी म्हणत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत प्रवेश करण्यासाठी अनेक अभिनेत्री सुरुवातीला मॉडलिंग करतात. त्यानंतर त्यांना चित्रपटांची ऑफर मिळते. आजवर तुम्ही अनेक अभिनेत्रींना मॉडलिंग करताना पाहिलं असेल. मात्र तुम्ही एखाद्या आजीबाईंना मॉडलिंग करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका आजीने चक्क कॅटवॉक केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका गावात खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू आहे. या खेळात अनेक महिला सहभागी झाल्यात. पैठणी मिळवण्यासाठी महिलांनी अनेक खेळांत भाग घेतला आहे. नवविवाहीत महिलांसह येथे अनेक वृद्ध महिला देखील पैठणी मिळवण्यासाठी खेळ खेळत आहेत.

अशात खेळ पैठणीच्या कार्यक्रमात आलेल्या एका आजींनी शांताबाई गाण्यावर कॅटवॉक केला आहे. आजींनी सुंदर नारंगी रंगाची साडी नेसलीये. डोळ्यांना चष्मा लावून या आजी स्टेजवर नाचता नाचता थेट कॅटवॉक करताना दिसतायत. @newhomeminister02 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट करत आजीचं कौतुक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT