Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : भररस्त्यात दोन आजीबाई एकमेकींना भिडल्या; खराटा अन् टप बालद्यांनी जोरदार हाणामारी

Women fighting Viral Video : हाणामारी करणाऱ्या या महिला किंवा तरुणी असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर भर रस्त्यात दोन आजीबाई एकमेकींना भिडल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral video :

महिलांच्या भांडणांचे आजवर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही व्हिडिओमध्ये अगदी हाणामारी देखील दिसते. आता हाणामारी करणाऱ्या या महिला किंवा तरुणी असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर भररस्त्यात दोन आजीबाई एकमेकींना भिडल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक आजीबाई हातात खराटा घेऊन रस्ता झाडत आहे. तर दुसऱ्या आजीबाई हातात टप घेऊन तेथे उभ्या आहेत. अचानक या दोघींमध्ये मोठा वाद पेटतो. वाद इतका वाढतो की दोघी एकमेकींना मारण्यासाठी पुढे येतात. यातील एक आजी हातातला टप दुसऱ्या आजीला जोरात मारते. मग दुसरी आजी देखील खवळते आणि आपल्या हातातला खराटा घेऊन तिला मारू लागते.

आता या दोघींमध्ये होणाऱ्या भांडणाचा विषय किती गंभीर आहे माहीत नाही. मात्र त्यांची भांडणे पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. हा हास्यास्पद प्रकार तिथे असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत या व्हिडिओला WWE चं म्यूजिक लावलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तच फनी वाटत आहे.

@mohdjahangire या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज आणि लाइक्स मिळालेत. तसेच अनेकांनी यावर हसण्याचे ईमोजी शेअर केले आहेत. पूर्वी अनेक ठिकाणी पाण्याचे नळ सार्वजनिक होते. त्यामुळे पाणी भरताना हमखास महिला अशा पद्धतीने भांडायच्या.

मुंबई लोकल ट्रेन, एसी ट्रेन आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. तसेच काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयातील दोन तरुणी एकमेकींना भिडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अनेक व्यक्ती तर सोशल मीडियावर फेमस व्हावे यासाठी देखील अशा पद्धतीचे व्हिडिओ शूट करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

SCROLL FOR NEXT