CCTV Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

CCTV Viral Video: दुचाकीवरून दोन मुली खाली कोसळल्या; वाचवायचं सोडून तरुण स्कुटी घेऊन फरार... घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Viral Video: अन्य व्यक्ती त्यांना उठून उभे राहण्यास मदत करतात. मुली स्वतःला सावरून थोड्या उभ्या राहतात आणि आपली स्कूटी शिधण्यास सुरुवात करतात.

Ruchika Jadhav

Viral Video:

पापा की परी म्हणत दुचाकीवरून खाली पडणाऱ्या मुलींचे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहे. अपघात झाल्यावर तो कितीही हस्यास्पद असला तरी मुलींना वाचवण्यासाठी सर्वजण धाव घेतात. मात्र एका तरुणाने असं न करता गर्दीचा फायदा घेत हात साफ केलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी दुचाकीवरून चालल्या आहेत. रस्त्याने जास्त असताना अचानक वाहन चालवणाऱ्या मुलीचा तोल जातो आणि ती खाली कोसळते. तिच्या पाठोपाठ मागे बसलेली मुलगी देखील खाली पडते. दोघीही खाली कोसळल्याने सर्वजण त्यांच्या दिशेने धाव घेतात.

तरुणींना वाचवण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या अनोळखी व्यक्ती त्यांच्या दिशेने धाव घेतात. गर्दी जमा होते. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी बाग्यांची देखील गर्दी होते. काही वेळाने मुलींच्या पायावरून एक तरुण दुचाकी बाजूला करतो. अन्य व्यक्ती त्यांना उठून उभे राहण्यास मदत करतात. मुली स्वतःला सावरून थोड्या उभ्या राहतात आणि आपली स्कूटी शोधण्यास सुरुवात करतात.

त्यावेळी स्कूटी त्यांना तिथे दिसत नाही. आधीच पायाला लागल्याने त्या त्रस्त असतात त्यात आता स्कूटी कुठे गेली या विचाराने आणखी चिंतेत येतात. ही संपूर्ण घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुली जेव्हा खाली पडतात तेव्हा त्यांच्या पायावरून ज्याने दुचाकी बाजूला घेतली तो तरुण दुचाकी घेऊन फरार होतो.

जमलेल्या गर्दीचा फायदा घेत तरुणीने मोठ्या चतुराईने दुचाकी चोरली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @thats_ak7 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हसण्याचे ईमोजी पाठवलेत. तर काहींनी तरुणाने चोरी केल्याने संतापही व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT