Viral News 
व्हायरल न्यूज

Viral News: रील्ससाठी घडवला सिलेंडर स्फोट? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Viral News: घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होतानाचा व्हिडिओ समोर आलाय. एवढा स्फोट होऊनही सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही? त्यामुळे हा व्हिडिओ नक्की खरा आहे का? अशी घटना घडली होती का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहून गृहिणींना किचनमध्ये जाण्याची हिंमतही होणार नाही. कारण, किती भयानक हा व्हिडिओ आहे पाहा.2 मिनिट 55 सेकंदाचा हा व्हिडिओ नीट पाहा.किचनमध्ये गॅस लिक झाल्यानंतर महिलेनं सिलेंडर हॉलमध्ये आणला...यावेळी सिलेंडरमधून गॅस लिक होत असल्याचं स्पष्ट दिसतंय.

गॅस लिक होत असल्याने घरातील एक महिला आणि व्यक्ती घराबाहेर पळाले आणि काही वेळानंतर पुन्हा सिलेंडरजवळ आले.यावेळी किचनमधून आग सिलेंडरच्या दिशेनं आली आणि एकच भडका उडाला.यावेळी दोघांनीही पळ काढला. मात्र, हा स्फोट खरंच झाला की, रील्ससाठी काही एआयच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवलाय...? असेही सवाल उपस्थित झाल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

सिलेंडर गॅस लिकेजमुळे आगीची घटना खरी

LPG सिलेंडरमधून सगळा गॅस बाहेर पडला

दार खिडक्या उघड्या असल्याने गॅस हवेत विरघळला

बर्नर गरम असल्यामुळे आग लागली

सिलेंडरचा स्फोट झालेला नाही

त्यामुळे प्रत्येक घरात सिलेंडर असतो. बर्नर, शेगडी, गॅसचा पाईप वारंवार तपासून पाहावा. यामध्ये गॅसचा पाईप खराब झाल्यामुळे गॅस लिकेज झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय..त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी पाहुयात.

गॅस गळती झाल्यास काय करावे?

घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा

सिलेंडरचा रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप बसवा

जाड चादर, ब्लँकेट पाण्यात भिजवून सिलेंडरला गुंडाळा

एवढी जरी काळजी घेतली तरी मोठा धोका टाळता येतो...आमच्या पडताळणीत रिल्ससाठी सिलेंडर स्फोट केल्याचा दावा असत्य ठरला असून, खरंच ही आग लागल्याचा दावा सत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT