Beggar with iPhone 16 Pro Max Saam Tv
व्हायरल न्यूज

Beggar iPhone Viral Video : EMI नाही तर कडकडीत नोटा! भिकाऱ्याने घेतला iPhone 16 Pro Max, पाहा व्हिडीओ

Beggar iPhone 16 Pro Max Video : सोशल मीडियावर आयफोन 16 घेऊन भीक मागणाऱ्या भिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भीक मागून मिळवलेल्या पैश्यांतून आयफोन घेतला असल्याचे भिकाऱ्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Yash Shirke

Beggar iPhone 16 Pro Max Video : आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल प्रत्येकजण आयफोन खरेदी करत असल्याचे पाहायला मिळते. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत अ‍ॅपल प्रोडक्टस् वापरत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भिकाऱ्याकडे आयफोन 16 प्रो मॅक्स असल्याचे दिसते.

काही महिन्यांपूर्वी आयफोन 16 आणि त्याचे अपडेटेस व्हर्जन लॉन्च झाले होते. लाखभर किंमत असलेले आयफोन विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. खास करुन तरुणांमध्ये नव्या आयफोनची क्रेझ पाहायला मिळत होती. काहींनी तर EMI वर आयफोन 16 विकत घेतले होते. दरम्यान रोख कॅश देऊन आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी करणाऱ्या भिकाऱ्याची माहिती समोर आली आहे.

हा भिकारी राजस्थानच्या अजमेर शहरामध्ये राहतो. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भिकाऱ्याच्या हातामध्ये नवाकोरा आयफोन दिसतो. समोरुन प्रश्न विचारल्यानंतर तो स्वत:चे नाव सांगतो. हातातला फोन आयफोन 16 प्रो मॅक्स असून त्याची किंमत १ लाख ७० हजार रुपये इतकी असल्याचे तो भिकारी सांगतो. हा आयफोन कॅश देऊन खरेदी केल्याचेही तो सांगतो. व्हिडीओच्या भिक मागून मिळवलेल्या पैश्यांंतून आयफोन घेतला असे त्याने म्हटले.

या व्हिडीओची खास गोष्ट म्हणजे तो भिकारी विचारलेल्या प्रश्नांची इंग्रजीमध्ये उत्तरे देतो. अजमेर, राजस्थानमधला हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी भिकाऱ्याने आयफोन चोरला असल्याचे म्हटले आहे. तर काही यूजर्सनी हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असून मुद्दाम तयार करण्यात आला आहे असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT