Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मस्तच! हळदीच्या कार्यक्रमात बाप-लेकीचा भन्नाट डान्स; जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल

Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बाप- लेकीचा धमाकेदार डान्स आहे. जो प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे.

Tanvi Pol

Fathers And Daughters Dance: बाप अन् लेकीचं नातं कायम खास असतं हे प्रत्येकाने अनुभवल असेलच. आपल्या आजूबाला किंवा व्हायरल व्हिडिओमधून अनेक खास क्षण या नात्यासंबंधित पाहण्यास मिळतात. सध्या अशाच एका बाप-लेकीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात डान्स करताना दोघांची जुगलबंदी पाहण्यास मिळत आहे.

हळदीच बाप-लेकीचा धमाल डान्स पहा

व्हायरल(VIRAL) होत असलेल्या व्हिडिओत सर्वत्र हळदीचा कार्यक्रम असलेला दिसत आहे. हळदीत सहभागी झालेला प्रत्येकजण पिवळ्या रंगाच्या कपड्यात दिसत असून काही वेळात या कार्यक्रमात डान्स करण्यास सर्वजण सुरुवात करतात. डान्स करताना प्रत्येकजण दिसत असून त्यात एक तरुणी आणि तिचे वडील सहभागी झालेले आहे. मग काय ''गोरी नवरी मांडव खाली'' या गाण्यावर दोघांनी धडाकेबाज डान्स केला आहे. हळदीमध्ये असलेले सर्वजण बाप-लेकीचा डान्स पाहून खूष झालेले दिसत आहेत.

हळदीमधील डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''mauu_alert'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच काही दिवसांत व्हिडिओला २२ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी पसंती दिलेली आहे तर अनेक विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

बाप-लेकीचा डान्स व्हिडिओ अनेक यूजर्संच्या पसंतील आलेला आहे, त्यातून अनेक प्रतिक्रियाही त्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कडक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच डान्स'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे की,'' छान'', अशा अनेक प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT