This viral elephant video, claimed to show Mahadevi from Kolhapur, is actually from a foreign country – Fact check by SAM TV. Saam Tv
व्हायरल न्यूज

Mahadevi Elephant: महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं? महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल?

Fact Check: कोल्हापुरातून वनतारामध्ये नेलेल्या महादेवी हत्तीणीच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल होतोय...या व्हिडिओत हत्तीण चिमुकल्याला वाचवताना दिसतेय...पण, खरंच हा व्हिडिओ महादेवीचा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Omkar Sonawane

हा व्हिडिओ महादेवी हत्तीणीच्या नावाने प्रचंड व्हायरल होतोय...या व्हिडिओत बघा, हत्तीण चिमुकल्याला सोंडेत पकडून ती सुखरुप वरती उभ्या असलेल्या व्यक्तींकडे देतेय...अगदी सहज सोंडेतून पकडून चिमुकल्याला वाचवतानाचा हा व्हिडिओ आहे...आणि ही हत्तीण कोल्हापुरातील महादेवी असल्याचा दावा करण्यात आलाय...

हा व्हिडिओ व्हायरल करून आज समजलं कोल्हापूरकर आणि सांगलीकर का वेडे होते या महादेवीसाठी? असा मेसेजही व्हायरल केला जातोय...पण, खरंच ही महादेवी हत्तीण आहे का...? कारण, महादेवी हत्तीणीला अंबानींच्या वनतारात नेल्यानंतर हजारो कोल्हापूर, सांगलीकर रस्त्यावर उतरले...नांदणी मठातील हत्तीणीला नेताना लोक रडत होते...आता महादेवीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम उघडली...मात्र, हा व्हिडिओ महादेवीचा असल्याचा दावा केल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...हा व्हिडिओ महादेवीचा आहे का...? याबाबत स्थानिकांकडून अधिक माहिती जाणून घेतली...

हा व्हिडिओ परदेशातील असल्याची माहिती

महादेवी हत्तीणही या हत्तीणीसारखी प्रेमळ

महादेवीला वनतारात नेल्यामुळे व्हिडिओ व्हायरल

प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना असतात...ही हत्तीण लहान मुलाला वाचवताना दिसतेय...यावेळी तिला पाहणारे लोक टाळ्या वाजवतायत...मात्र, महादेवीनं चिमुकलीला वाचवल्याचा हा व्हिडिओ असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT