Fact Check Viral video claims petrol price in India may reach ₹500 per litre amid war fears AI
व्हायरल न्यूज

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

Will Petrol Price Reach 500 Rupees In India: युद्धामुळे भारतात पेट्रोलचा दर 500 रुपये प्रति लिटर होणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दाव्याची पडताळणी केल्यानंतर समोर आलेले सत्य जाणून घ्या.

Sandeep Chavan

या व्हिडिओत जो दावा केलाय तो गंभीर आहे...युद्धामुळे पेट्रोलचे दर तब्बल 500 रुपयांवर जाणार असल्याचा दावा केलाय...पण, खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई देशात निर्माण होऊ शकते का...? इराणने होर्मूझ जलमार्ग बंद केल्यामुळे हा परिणाम असल्याचा दावा केलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? आपल्या देशात पुरेसा इंधनसाठा नाही का...? कारण, गॅससाठी लोक रांगेत उभे आहेत...पुन्हा पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागल्या तर हाहाकार उडेल...महागाईचा भडका उडेल...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...

...सध्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यायत...प्रति बॅलर सुमारे 100 डॉलर इतकी किंमत आहे...आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधनाचे दर वाढतात...आर्थिक तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत 10 डॉलर प्रति बॅरल वाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अंदाजे 5-6 रुपये वाढ होऊ शकते...हा थेट परिणाम नेहमीच पंपांच्या किमतींवर दिसून येत नाही...कारण सरकार आणि तेल कंपन्या अनेकदा किमती नियंत्रित करतात...पण, खरंच आता पेट्रोल 500 रुपयांवर जाऊ शकतं का...? याची आम्ही पडताळणी करण्यासाठी काही ऑईल कंपन्यांच्या वेबसाईट पाहिल्या...मात्र, आम्हाला अशी कुठेही माहिती मिळाली नाही...त्यामुळे एक्सपर्टकडून अधिक माहिती जाणून घेतली... त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

पेट्रोलच्या किंमती 500 रुपयांवर जाणार ही अफवा

भारताकडे अनेक महिने पुरेल इतका साठा उपलब्ध

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा साठा उपलब्ध

पुढील काही दिवसातच LPGचा साठा सुद्धा सुरळीत होईल

तरी देखील भारतात पेट्रोलचा दर कसा ठरवला जातो...त्यावर एक नजर टाकूयात...

कसा ठरवला जातो पेट्रोलचा दर?

मुंबईतील दर-करांचं विभाजन

डीलरला आकारलेली मूळ किंमत- 56 ते 58 रु.प्रति लिटर

केंद्रीय उत्पादन शुल्क- 19.90 रु. प्रति लिटर

डीलर कमिशन- 3.80 ते 7.78 रु. प्रति लिटर

एकूण व्हॅटची रक्कम- 21.16 ते 21.26 रु. प्रति लिटर

पेट्रोलची किंमत 103.54 रुपये प्रति लिटर

अशा प्रकारे आपल्याला पेट्रोल मिळतं...मात्र, युद्धामुळे पेट्रोल 500 रुपयांवर जाणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...अफवा पसरवण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केले जातात...त्यामुळे खोटे व्हिडिओ, मेसेज पाहून विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT