Viral Boy Dance video Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Boy Dance Video: मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणाचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Viral Boy Dance video: मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने विचित्र डान्स केला आहे. रेल्वे स्टेशनवर केलेला डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर फार गजबज पाहायला मिळते. रेल्वे स्टेशनवर प्रत्येक जण घरी किंवा कामावर जाण्यासाठी घाईत असतो. याच मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर एका तरुणाने विचित्र डान्स केला आहे. रेल्वे स्टेशनवर केलेला डान्स प्रचंड व्हायरल झाला आहे. तरुणाच्या विचित्र डान्सवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर तरुणाने केलेल्या डान्सचं काही जण कौतुक करत आहे. तर काही जण डान्स करणाऱ्या तरुणाची खिल्ली उडवत आहेत. तरुणाच्या विचित्र डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

ट्विटरवर @swatic12 या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि पँट घातलेल्या तरुणाने भन्नाट डान्स केला आहे. या तरुणाची अनेक नेटकरी खिल्ली उडवत आहेत. मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर (Andheri Railway Station) तरुणाने हा विचित्र डान्स केला आहे.

नेटकरी त्याला सोल्जर सिनेमातील बॉबी देओल असे बोलत आहेत. तर काही जण 'दिल तो पागल है' सिनेमातील शाहरुख खान असे बोलत आहेत.

भरपावसात तरुणाचा विचित्र डान्स

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'तरुण रेल्वे स्टेशनवर विचित्र डान्स (Dance) करत आहे. तरुणाच्या आजूबाजूला कोणीच दिसत नाहीये. सर्व प्रवासी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत. तरुण डान्स करताना त्याच्या मागून लोकल ट्रेन (Local Train) जाताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून अनेकांचं मनोरंजन होत आहे.

व्हिडिओमधील तरुण अक्षरश: उड्या मारत डान्स करत आहे. तर या व्हिडिओमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या तरुणाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT