Viral BJP morcha woman seen confronting leaders; fact check reveals she is not Bigg Boss fame Pooja Mishra. saam tv
व्हायरल न्यूज

भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला सापडली? जाब विचारणारी महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा?

BJP Morcha Viral Woman Real Identity Fact Check: भाजपच्या मोर्च्यात संताप व्यक्त करणारी महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा असल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. ट्रॅफिक कोंडीत अडकून संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचा आणि पूजा मिश्रा यांचा कोणताही संबंध नसल्याचे सामच्या पडताळणीत स्पष्ट झाले.

Sandeep Chavan

ही महिला भाजपच्या मोर्च्यात नडली आणि तुफान व्हायरल झाली...ही महिला बिग बॉस फेम पूजा मिश्रा असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, ही व्हायरल महिला खरंच बिग बॉस फेम आहे का...? तिने आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा राडा घातल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच वाहतूक कोंडीचं कारण होतं की फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा राडा होता...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...ही महिला कोण आहे...? तिचा शोध घेतला जातोय...त्यात आता ही बिग बॉस फेम असल्याचा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...

...आता हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा...यात ही महिला मंत्री महाजनांसह भाजपच्या कार्यकर्त्यांना जाब विचारताना दिसतेय...तर दुसरीकडे फोटोत दिसत असलेली बिग बॉस फेम पूजा मिश्रा हीच ती महिला असल्याचा दावा केलाय...पण, खरंच ही पूजा मिश्रा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली....त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला पूजा मिश्रा नाही

जाब विचारणारी महिला 'बिग बॉस' फेम नाही

महिला आपल्या मुलाला शाळेतून आणायला जात होती

ट्रॅफिकमध्ये 1 तास अडकून पडल्यानं तिने संताप व्यक्त केला

बिग बॉस फेम पूजा आणि या महिलेचा संबंध नाही

आता या दोन्ही विंडो पाहा...पहिल्या विंडोत वरळीत भाजप मोर्च्यात नडणारी महिला आहे...तर दुसऱ्या विंडोत बिग बॉस फेम पूजा मिश्रा आहे...मात्र, दोन्ही महिला वेगवेगळ्या आहेत... या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने अनेकांनी पूजा मिश्राचा व्हिडिओ व्हायरल करून हीच ती महिला असल्याचा दावा केला...मात्र, आमच्या पडताळणीत भाजपच्या मोर्च्यात नडणारी महिला पूजा मिश्रा असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

भजन करताना चक्कर आली अन्..; थोर समाज प्रबोधनकार रामधन महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन| VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT