Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Tiger - Deer Hunting Video: खरंच ना भावा! वाघाची शिकार हरणीने केली; सत्य घटनेचा VIDEO व्हायरल

Dabkya Pavalani Aali Mazi Malkin Zali Original Concept Video: सर्वजण यावर आपल्या रील व्हिडिओ वनवतात. अशात वाघाची शिकार एका हरणीनं केली हे मराठी गाणं सध्या भलतच चर्चेत आलं आहे.

Ruchika Jadhav

Animals Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा नवा चित्रपट रिलीज झाला की त्याची गाणी देखील बरीच चर्चेत असतात. रील व्हिडिओमुळे प्रत्येक चित्रपटातलं एक तरी गाणं भन्नाट गाजतं. सर्वजण यावर आपल्या रील व्हिडिओ बनवतात. अशात वाघाची शिकार एका हरणीनं केली हे मराठी गाणं सध्या भलतच चर्चेत आलं आहे. (Latest Viral Video)

'दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली; एका वाघाची शिकार एका हरणीनं केली' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. अनेकांनी यावर आपले रील व्हिडिओ बनवले आहेत. अशात याच गाण्यावरचा आणखीन एक रील व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जसे शब्द आहेत अगदी तसंच चित्र दिसत आहे.

व्हिडिओमध्ये खरोखर एका वाघाची शिकार एक हरणीन करणार असं दिसत आहे. तुम्ही देखील पाहू शकता की, व्हिडिओमध्ये एक घनदाट जंगल दिसत आहे. काळोख्या अंधारात वाघ आपली शिकार शोधण्यासाठी चालला आहे. तितक्यात त्याच्या मागून एक हरीण येते. अगदी गाण्यात जसे बोल आहेत त्याचप्रमाणे हरीण दबक्या पावलांनी येत आहे.

ही संपूर्ण दृश्य जंगलात असलेल्या हिडन कॅमेऱ्यात कैद झालीत. एक हरीण एका वाघाची शिकार करेल हे अशक्य आहे. मात्र व्हिडिओ पाहून सगळेच चकित झालेत. हे कसं शक्य आहे अशा कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. गाण्यासह प्राण्यांचा हा व्हिडिओ देखील भन्नाट व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT