Vidyanand Bapat DJ dance viral video truth saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

Vidyanand Bapat Viral Video: डीजेविरोधी विद्यानंद बापट यांचा नवा व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडिओत चक्क बापट डीजेवरच नाचताना दिसताहेत... मात्र, या व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय आहे?... चला पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

पोरं नाही ऐकणार, बापटांना नाचवणार.. होय.. होय.. आपल्या अस्खलित मराठी वाक्चातुर्यानं भल्याभल्यांना गारद करणाऱ्या विद्यानंद बापटांचा डीजेवरच नाचतांनाचा एक व्हिडीओ समोर आलाय. पुण्यातल्या गणेश पेठ मधील गणेश विकास मंडळानं थेट एलईडी स्क्रीनवरच बापटांचा नाचतांनाचा व्हिडीओ दाखवलाय. हा बघा, पाहिलंत.. हे तेच विद्यानंद बापट आहेत ना? जे ढोलताशांच्या गजरात नाचतायेत.?

याच विद्यानंद बापटांनी पुणेकर कार्यकर्त्यांचा मोठा विरोध डावलून प्रसंगी मार खाऊनही डिजेला विरोध कायम ठेवला होता. आणि तेच बापट ढोल ताशांच्या गजरात नाचतांना पाहून अनेकांना आश्चर्य वाटू लागलं. पण हा सगळा प्रकार काय आहे पाहा,

बापटांचा नाचतांनाचा व्हिडीओ प्रचंड वायरल झालाय. पण हा व्हिडीओ खरा नाही. बापट कुठंही नाचले नाही, किंवा कोणत्याची मिरवणूकीत ते सहभागी झालेले नाहीत तर हा एआयच्या माध्यमातून केलेला व्हिडीओ आहे. केवळ आणि केवळ बापटाच्या डिजेविरोधाला विरोध म्हणूनच खिल्ली उडवण्यासाठी हा एआय व्हिडीओ बनवण्यात आलाय. यावर अद्याप बापटांची प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी या व्हिडीओनंतर पुणे तिथं काय उणे याचाच पुन्हा प्रत्यय पुणेकरांच्या या क्रिएटिव्हीटीनं आलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT