pakistan Viral Video  
व्हायरल न्यूज

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

Pakistan Viral Video : यााल कुणीतरी सांगा, हा गाढव नाही वाघ आहे, पाकिस्तानमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Namdeo Kumbhar

Pakistan Viral Video : पाकिस्तानच्या लोकांचा काही नेम नाही, ते कधी काही करतील याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही. पाकिस्तानमधील अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पिठासाठी भांडणं, उद्घटनला मॉल लुटला, फुगे बांधून लग्नाचे हवेत फोटोशूट, डोक्यावर सीसीटीव्ही यासारखे अनेक अतरींगी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता पाकिस्तानमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे.

पाकिस्तानमधील व्यक्ती चक्क वाघावर बसून फेरफाटका मारतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाघ समोर आला, तर आपल्याला भीती वाटतेच. प्राणिसंग्रहालयात जरी वाघ असला, त्याने कटाक्षाने आपल्याकडे पाहिलं तरी आपल्याला थोडी का होईना पण मनात भीती येतेच. मग त्याच्या जवळ जाणं तर दूरच.. पण पाकिस्तानमधील एका तरुणाचा वाघावर बसून फेरफटका मारणारा व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या या रिलस्टारवर टीका केली आहे.

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाकिस्तानमधील एक माणूस वाघावर घोडा असल्याप्रमाणे बसल्याचे दिसतय. हा वाघ बेड्याबंद आहे. नौमन हसन यानं इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. हा धक्कादायक व्हिडिओने सोशल मीडियावर अवघ्या काही दिवसात एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो माणूस एका मोठ्या वाघावर बसलेला दिसत आहे. मोकळ्या भागातून वाघावर फेरफटका मारताना दिसतोय. व्हिडीओत मागे दोन पिंजरे दिसतात. एकामध्ये सिंह आणि दुसऱ्यामध्ये सिंहीण आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. वाघ हे काय खेळणं आहे का? वाघाला आपल्या मनोरंजनासाठी कोण वापर करतं? यासारख्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदासाठी अंबादास दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सिल्की केसांसाठी ५ सोप्या हेअरस्टाईल्स

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! पत्नीसोबत उघडा जॉइंट खातं अन् महिन्याला कमवा ₹8,633 रुपये

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT