Dausa Junction Video  Saam tv
व्हायरल न्यूज

Dausa Junction Video : धावती ट्रेन पकडताना तो पडला, हातातली बॅग चाकाखाली चिरडली अन्...; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Dausa Junction Train Accident Viral Video : एक व्यक्ती धावती ट्रेन पकडताना खाली पडला. प्रवाशांनी वेळीच त्याला मागे खेचल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.

Ruchika Jadhav

धावती ट्रेन पकडू नये अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र तरी देखील अनेक व्यक्ती सर्रास धावती ट्रेन पकडतात. पद्धतीने धावती ट्रेन पकताना अपघात होऊन आजवर अनेक व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. ट्रेन अपघाताचे अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात आता देखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती धावती ट्रेन पकडताना खाली पडलाय. या थरारक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या दौसा जंक्शन येथे ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हा व्यक्ती मरुधर ट्रेनमधील S5 मध्ये जात होता. तितक्यात ट्रेन सुरू झाली. त्याला काही करून ट्रेन पकडावी वाटली. त्यामुळे या व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर धावण्यास सुरुवात केली. धावता धावता त्याचा तोल गेला. यावेळी त्याच्या हातात एक मोठी सुटकेस बॅग होती. तोल गेल्याने हा व्यक्ती खाली पडला. त्यावेळी हातातील बॅग देखील खाली पडली.

पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुदैवाने त्याच्या हातातील बॅग ट्रेनच्या चाकाखाली आली. तसेच S5 कोचमध्ये एक व्यक्ती दरवाजा जवळ बसला होता. या प्रवाशाने त्या खाली पडलेल्या व्यक्तीला मागे ढकललं. त्यामुळे खाली पडलेला व्यक्ती प्लॅटफॉर्मवरच राहिला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले. तसेच अन्य प्रवाशांनी तातडीने या व्यक्तीला उचलले.

घटनेची माहिती मिळताच आरपीएफच्या जवानांनी येथे धाव घेतली. या घटनेमुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉमवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील या व्यक्तीला खडेबोल सुनावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT