Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : आगीशी स्टंट करणं पडलं तरुणाला महागात!काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Stunt Viral Video : सोशल मीडियावर सध्या स्टंटचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात एका व्यक्तीचा जीव धोडक्यात बचावला गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आगीपासून कायम लांब राहण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. आगीसंबंधित सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.त्यात आगीसोबत स्टंट करताना अनेक व्यक्ती दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे,त्यात एका व्यक्तीला आगीसोबत स्टंट करणं अत्यंत महागात पडलेले आहे.सध्या सर्वत्र हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती त्याच्या काही मित्रासह डोंगराळ भागात फिरायला गेल्याचे दिसून येत आहे.पुढे त्यातील एका व्यक्तीच्या हातात आपल्याला मशान दिसून येतेय,काही वेळात ज्या व्यक्तीच्या हातात मशाल आहे,त्याच व्यक्तीच्या तोंडात पेट्रोल आहे. काही वेळात तोंडत असलेले पेट्रोल(Petrol) मशाल जवळ घेऊन त्यावर फुंकर मारतो मात्र त्या व्यक्तीची दाढी लांब असल्याने त्याच्या दाढीला आग लागल्याचे व्हिडिओत आपल्याला दिसून येते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @Pandeyshanayaa या अकाउटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधीही आपण असे अनेक व्हिडिओ पाहिले आहे,ज्यात असे स्टंट करणं तरुणांच्या अंगलट आलेले आहे तर अनेकांना धोकादायक स्टंट करण्याने जीवही गमवावा लागला आहे.

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्टंटचा(Stunt) व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.चला तर काही प्रतिक्रिया पाहूयात,ज्या नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. पहिल्या यूजर्संनी प्रतिक्रिया केलेली आहे की,'' नको ते कोणी करायला सांगितले आहे'',तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''असं स्टंट वाढत चालले आहे''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT