Girls Fighting  Saam Tv
व्हायरल न्यूज

Girls Fighting: मेट्रोमध्ये दोन तरुणींची जोरदार हाणामारी, केस ओढत एकमेंकींना तुफान तुडवले

Girls Fighting In Metro: सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ कायमच पाहण्यासाठी मिळतात. त्यातच पुन्हा एकदा अशाच एका हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेमकी ही घटना कुठे घडली ते पाहा.

Tanvi Pol

Metro Viral Video: शहराच्या मेट्रोमध्ये दोन तरुणींची जोरदार हाणामारी झाली आहे. ज्यात त्या एकमेकांचे केस ओढत आणि जोरदार चोप देत तुफान भिडल्या. ही घटना मेट्रोच्या एका डब्यात घडली आणि त्या दोघींची झटापट पाहून प्रवासी थक्क झाले. काही प्रवाशांनी ही घटना मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

शहराच्या(City) मध्यभागी असलेल्या एका मेट्रो स्थानकावरून मेट्रोमध्ये दोन तरुणी प्रवास करत होत्याय दरम्यान काही कारणावरुन दोघींमध्ये वाद सुरु झाला. सुरुवातीला साधारण वाटणारा हा वाद अचनाक वादविवादात आणि त्यानंतर एकमेंकीनी जबरदस्त हल्ला केला. हाताने जोरदार चाप, एकमेंकीना तुडवत होत्या. दोघींना शांत करण्यासाठी इतर प्रवाशी पुढे आले. मात्र, त्या कोणाचेही ऐकत नव्हत्या.

तरुणींच्या हाणामारीचा फुल ऑन ड्रामा पाहून काही प्रवाशांनी त्वरित मोबाइल काढून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. काहींनी अशा वादविवादामुळे प्रवास अडचणीत येत असल्याने नाराजी व्यक्त केली, तर काहींनी दोन्ही तरुणींच्या अशा वर्तनाला नकार दिला. अनेक प्रवाशांनी हळूवार आणि संयम ठेवण्याची विनंती केली. तरीही, काही प्रवाशांना या दंगलाने मोठा त्रास झाला, विशेषतः ज्यांच्याबरोबर लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक होते.

हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील guptajii190 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर इन्स्टाग्राम सोडून फेसबूक, ट्वीटर(एक्स) अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. लोकांनी व्हिडिओला हजारो लाईक्स करत मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT