Snake Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: कोब्रा आणि मांजर समोर-समोर भिडले; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO

Viral Video: काही व्हिडीओ कधी प्राण्यांच्या भांडणांचे असतात तर कधी त्यांनी केलेल्या चांगल्या कृतीचे असतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Snake Viral Video

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी एकादा फोटो असो वा व्हिडीओ तो झटक्यात व्हायरल होत असतो. या व्हिडीओ आणि फोटोंची चर्चा झाल्याशिवाय राहत नाहीत. या व्हिडीओंमध्ये प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. यामधील काही व्हिडीओ कधी प्राण्यांच्या भांडणांचे असतात तर कधी त्यांनी केलेल्या चांगल्या कृतीचे असतात. कधीकधी हे प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला देखील लावतात तर कधी इमोशनल देखील करतात. आता सध्या सोशल मीडियावर नाग आणि मांजराच्या भांडणाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपण आतापर्यंत साप आणि मुंगूस यांच्यामधील झटापटीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. साप आणि मुंगुसाचे वैर सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच मुंगुसाप्रमाणेच मांजर आणि साप देखील एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. एकदा मांजरीने साप पाहिला की ती न घाबरता त्याचा सामना करते. याचाच प्रत्यय या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून आला आहे. या व्हिडीओमध्ये पुढं नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडीओच पाहावा लागेल.

या व्हिडीओ आपल्याला दिसत आहे की, एका छोट्या बॉक्समध्ये मांजर शांतपणे बसलेली दिसत आहे. तेवढ्यात तिथं काळ्या रगांचा भलामोठा नाग येतो. नागाला पाहून मांजर उभी राहते आणि पंज्याने मारत स्वत:चा बचाव करू लागते. नाग देखील फना काढून तिला डसन्याचा प्रयत्न करतो. पण मांजर मागे हटत नाही ती देखील नागावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. मांजरीचे रौद्ररूप पाहून नाग घाबरून तिथून निघून जातो. या व्हिडीओमध्ये अशाच प्रकारचे मांजर आणि सापाच्या भांडणांचे इतर व्हिडीओ देखील दिसत आहेत.

@Rainmaker1973 या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. सोशल मीडियावर मांजरीच्या चपळाईचे आणि शौर्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मांजरीने न घाबरता शेवटपर्यंत नागाचा सामना केला आणि त्याला पळवून लावले हे नेटिझन्सला खूप आवडले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आत्तापर्यंत आम्हाला असे वाटायचे की, सापाशी लढण्याची हिंमत फक्त मुंगूसात आहे, पण आता कळले की मांजरही मुंगूसची आजी आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT