Viral Proposal Ideas Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : भावा, मानलं तुला! प्रपोज करण्याचा नवा 'जुगाड', हटके स्टाईल पाहून लोक झाले वेडे, पाहा व्हिडिओ

Viral Proposal Ideas Video : व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्हाला देखील तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रपोझ करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. वाचा प्रपोझ करण्याची हटके पद्धत. सोशल मीडियावर देखील होतेय तुफान व्हायरल.

Alisha Khedekar

  • पाणीपुरीत अंगठी लपवून तरुणाने केलं प्रपोझ

  • व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल

  • नेटकऱ्यांकडून हटके आयडियाचे कौतुक

  • व्हॅलेंटाईन डे निमित्त अनोख्या प्रपोजलची सोशल मीडियावर चर्चा

खरं तर प्रेम कधीही व्यक्त करू शकता. मात्र सोशल मीडियापासून सुरु झालेला आणि तरुणाईला हवाहवासा वाटणारा ट्रेंड म्हणजे व्हॅलेंटाईन वीक. या प्रेमाच्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनेक तरुण मंडळी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सोशल मीडियावर प्रपोझ करण्याच्या वेगवेगळ्या स्टाईल सध्या व्हायरल होत आहेत. अशीच एक प्रपोझ करण्याची स्टाईल सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नेटकरी देखील या हटक्या स्टाईलच कौतुक करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोझ करण्यासाठी एका पाणी पुरीच्या स्टॉलवर घेऊन जातो. तिथेच पाणी पुरीची कोरडी पुरी घेऊन त्यामध्ये अंगठी टाकतो. त्यानंतर तरुणीला सरप्राईज करत तरुण एका पायावर खाली बसून तरुणीला प्रपोझ करतो.

तरुणाच्या या कृत्याने तरुणी भारावून जाते. तिच्या चेहऱ्यावर हसू खुलतं. आणि बॉयफ्रेंडने दिलेली अंगठी बोटात घालते. त्यांच्या या आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर muhrat.weddings नावाच्या अकाउंटने पोस्ट केला आहे. या व्हिडिओला २०,००० हून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

नेटकऱ्यांना व्हिडिओ आणि प्रपोजल दोन्ही आवडले आणि लोकांनी हार्ट इमोजीसह संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. प्रेमाच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच व्हॅलेंटाईनला तुम्हाला देखील तुमच्या आवडत्या मित्राला, मैत्रिणीला, क्रशला तुम्हाला प्रपोझ करायचं असेल तर ही हटके स्टाईल नक्की फॉलो करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT