Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: देव तारी त्याला कोण मारी! अचानक झाड कोसळलं, नशीब बलवत्तर म्हणून डिलिव्हरी बॉय वाचला

Viral Video News: सोशल मीडियावर वारंवार अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यातच एका घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. व्हायरल घटनेत नक्की काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Cctv Viral Video: शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. या घटनेत काही सेकंदांचा फरक त्याच्यासाठी जीवघेणा ठरु शकला असता, पण त्या दुचाकीस्वाराचे नशीब त्याच्यासोबत होते. ज्या व्हिडिओत रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या अंगावर अचानाक झाडाची मोठी फांदी कोसळली आणि त्याची दुचाकी घसरली. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या या सीसीटीव्ही व्हिडिओत दिसते की, रात्रीची वेळअसून त्याच वेळेस त्या रस्त्यावरुन एक डिलिव्हरी बॉय दुचाकीवरुन जात असतो. दरम्यान अचानक एका मोठ्या झाडाची फांदी कोसळली जाते. सुदैवाने काही सेंकदाने तो बचावला जातो. मात्र, त्याची दुचाकी रस्त्यावरुन घसरली जाते.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका जवळील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो आता एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरील @IndiaToday या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर अनेक व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्स मिळत आहेत शिवाय फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

सर्व घटना विरारमधील असल्याचे समजत असून या घटनेवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातीलच एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''खरंच नशीबवान होता'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''कधीही आता काहीही होते'' तर अशा अनेक हैराणजनक (Shocking) प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT