Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Teacher Viral Video : शिक्षिकेचा आक्षेपार्ह डान्स व्हायरल, विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती आणखी संतापजनक

Viral Video : रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Women Viral VIdeo :

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका शिक्षिकेचा आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षण विभागाने घटनेची तात्काळ दखल घेत शिक्षिकेला निलंबित केलं आहे. प्रभा नेगी असं या शिक्षिकेचे नाव आहे.

शिक्षिका प्रभा नेगी यांना रीलचं एवढं वेड लागलं की त्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला. आपण कुठे काय करावं याचं भान प्रभा यांना राहिलं नाही. रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. (Viral VIdeo)

प्रभा नेगी यांचे अनेक आक्षेपार्ह डान्स आणि कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यानंतर शाळेतील शिक्षकांनी याबाबत लेखी तक्रार केली. तक्रारीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने प्रभा नेगी यांना निलंबित केले आहे. तसेच दोन जणांची समिती स्थापन करून तपास सुरू केला आहे.

शिक्षिका प्रभा नेगी शाळेत सतत व्हिडिओ बनवत असत आणि सोशल मीडियावर अपलोड करतात. दरम्यान, शाळेच्या परिसराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी एका शिक्षिकेला याची माहिती मिळाली. यानंतर शाळेतील इतर शिक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली.

सध्या शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही सांगितले आहे. व्हिडीओ व्हायरल होताच काही विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी दिलेली माहितीही धक्कादायक होती. शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना देखील तिचे व्हिडीओ शूट करण्यास सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT