Viral Accident Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Accident Video: रस्ता क्रॉस करताना गोंधळली, आधी धडक मग रिक्षाच अंगावर पडली|VIDEO

Viral News: सोशल मीडियावर नुकताच एका व्हिडिओची खुप चर्चा होत आहे. हा व्हिडिओ एका भयंकर रस्ते अपघाताचा आहे. अपघात नेमका कसा घडला ते समजण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Women Accident Video: रस्ता ओलांडत असलेल्या दोन महिलेपैंकी एकीचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत महिला रस्ता ओलांडत असताना गोंधळून गेली, ज्यामुळे भरधाव वेगात असलेली रिक्षा नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली आणि महिलेच्या अंगावर पडली. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रस्ता ओलांडताना मोठा अपघात

व्हायरल(Viral) होत असलेल्या या व्हिडिओत दोन महिला रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची जास्त ये-जा होतही नाही. ज्या वेळेस महिला रस्ता क्रॉस करत असतात तेव्हा त्यातील एक महिला गोंधळलेली दिसून येत आहे. दरम्यान रस्ता क्रॉस करत असताना अचानक भरधाव वेगात रिक्षा येते आणि गोंधळेल्या महिलेला जाऊन धडकते. धक्कादायक म्हणजे ही रीक्षा नंतर महिलेच्या अंगावर पडते

अपघाताचा थरार CCTV मध्ये

अपघात घडताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी धावपळ सुरु झाली. अनेकजण महिलेच्या मदतीस धावले तर काहीजण रिक्षाला बाजूला सारत त्यातील प्रवाशांची मदत करु लागले. सर्व प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

संपूर्ण अपघाताचा (Accident) व्हिडिओ @inextlive या एक्सवरील अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सर्व घटना आग्राच्या फतेहाबादमधील असल्याचे समजते. मात्र,याची अद्याप पुष्टी झालेली नाही. आतापर्यंत हा व्हिडिओ देशभरात पाहिला गेला असून यावर नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT