Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माजुरडेपणा! रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दुचाकीवरून बेल्टने सपासप मारले, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा काही अशा घटना पाहण्यासाठी मिळतात ज्याने प्रत्येकाचा संताप अनावर होतो. सध्याही असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नक्की काय घडले त्यात ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Muzaffarnagar: बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काही युवक रस्त्यावरून निष्पापपणे जाणाऱ्या नागरिकांना दुचाकीवरून बेल्टने सपासप मारताना दिसत आहेत. ही घटना केवळ खळबळजनक नसून, सामाजिक रचनेच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसते की, तीन तरुण एका दुचाकीवरुन जात आहेत. एका दुचाकीवरुन तिघजण जात असताना हेल्मेट अशा वाहतुक नियमांचे पालन जराही केलेले नाही. धक्कादायक म्हणजे दुचाकीवरुन जात असताना मध्ये आणि दुचाकीवर शेवटचा तरुण रस्त्यावरुन जात असलेल्या सामान्य लोकांना बेल्टने मारत आहेत. सर्व प्रकार त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरील प्रत्येक अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर शेअर देखील केला गेला आहे. जसे की, इन्स्टाग्राम, एक्स, फेसबूक अशा मात्र, हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील aajtak या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर तो वाऱ्याच्या वेगाने नागरिकांनी पाहिला आहे.

नेटकऱ्यांच्या संतापजन प्रतिक्रिया

व्हिडिओ(Video) व्हायरल होताच तो प्रत्येक नेटकऱ्यांने पाहिला आहे. त्यानंतर त्यावर अनेक संतापजन प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''चांगला पोकळ बांबूचे फटके देयला पाहिले अशा तरुणांना'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय पागलपणा आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Credit Card Rules: क्रेडिट कार्डच्या नियमात ५ मोठे बदल; १ एप्रिलपासून थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Bhiwandi : भिवंडीत गेम पलटणार? भाजपला मोठा धक्का; 10 नगरसेवक काँग्रेससोबत जाणार?

How To Make Face Toner At Home: चेहऱ्याला लावण्यासाठी घरीच फेस टोनर कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT