7 Boys Ride One Bike Saam TV
व्हायरल न्यूज

7 Boys Ride One Bike: अरे ती बाईक आहे बस नाही! दुचाकीवरुन एकाचवेळी ७ जणांचा प्रवास, VIDEO VIRAL

Viral Video: भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवर स्टंट केल्याने अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागतो.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh: दुचाकीवर अतरंगी स्टंट करताना तरुणांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकीवर स्टंट केल्याने अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागतो.अशात आता देखील सोशल मीडियावर दुचाकीवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Latest Viral Video)

व्हायरल व्हिडीओमध्ये एकून सात तरुण एकाच दुचाकीवर बसून फिरत आहेत. दुचाकीवर (Bike) फक्त दोनच व्यक्ती बसतात. मात्र या व्हिडीओमध्ये सात तरुण दुचाकीवरुन प्रवास करतायत. या दुचाकी मागून एक कार जात आहे. त्यातील एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये या तरुणांचा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय.

@imrajni_singh या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या हापूर येथील आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने हापूर पोलिसांना देखील टॅग केलं आहे. यावर आता नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडलाय.

एकाने कमेंट करत पेट्रोल महाग झाल्याचं म्हटलं आहे. मुलांना प्रवासासाठी पेट्रोल किंवा वाहतुकीसाठी पैसे नसावेत त्यामुळेच त्यांनी ही पद्धत निवडली असं म्हटलं आहे. तर आणखीन काहींनी या मुलांवर संताप व्यक्त केलाय.

या आधी देखील बाईकवर आंघोळ करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. तसेच प्रेमी युगुलांचेही काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सातव्या मुलाला बसायला सीट उरलेलं नाही त्यामुळे तो थेट सहाव्या मुलाच्या खांद्यावर बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT