Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

दुसऱ्या मजल्यावर झोपला होता कर्मचारी, कूस बदलली अन्....चटका लावणारा व्हिडिओ व्हायरल

Firozabad Shocking Video: सोशल मीडियावर वारंवार अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका भयंकर घटनेचा आहे. जिथे झोपलेल्या कर्मचाऱ्याचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्य झाला.

Tanvi Pol

Factory Cctv Footage: उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यातील दिनोली मोड येथे असलेल्या मित्तल ओवरसीज फॅक्टरीत रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत ३२ वर्षीय कामगार पुष्पेंद्रचा मृत्यू झाला. तो दुसऱ्या मजल्यावर झोपलेला असताना अचानक खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना फॅक्टरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

पुष्पेंद्र नावाचा तरुण मुळचा उत्तर प्रदेशचाच(Uttar Pradesh) असून तो मित्तल ओवरसीज फॅक्टरीमध्ये काही वर्षांपासून काम करत होता. रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तो दुसऱ्या मजल्यावर झोपलेला होता. तो अत्यंत दमला असल्याने आल्यामुळे तो मजल्याच्या टोकाशीच झोपला होता. झोपेत असताना त्याने अचानक कुस बदलली आणि तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला.

यामध्ये त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. फॅक्टरीतील इतर कामगारांनी आवाज ऐकून धाव घेतली, पण तोपर्यंत पुष्पेंद्रचा श्वास थांबला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला.

सोशल मीडियावर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Viral) झालेले आहेत. सध्या तो व्हिडिओ इन्टाग्राम, ट्वीटर(एक्स) आणि फेसबूक अशा विविध प्लॅटफॉर्मवर अपलोड झालेला आहे. ही घटना इतकी दुर्दैवी होती की प्रत्येक प्रत्येकाने भावनिक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT