Ruturaj Gaikwad Twitter
व्हायरल न्यूज

Ruturaj Gaikwad Wife: ऋतुराज- उत्कर्षाची प्यारवाली लव्हस्टोरी! CSK चा विजय अन् भरमैदानात मारली मिठी - VIDEO

Ruturaj Gaikwad - Utkarsha Pawar Viral Video: ऋतुराज गायकवाड आणि त्याची होणारी बायको उत्कर्षा पवारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Utkarsha Pawar: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना रविवारी खेळवला जाणार होता.

मात्र पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना सोमवारी म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवण्यात आला. या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू जल्लोष करताना दिसून आले. दरम्यान ऋतुराज गायकवाड आणि त्याची होणारी बायको उत्कर्षा पवारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

उत्कर्षाने ऋतुराजला मारली मिठी..

हा सामना झाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजाचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रिवाबा जडेजा रवींद्र जडेजाच्या पाया पडताना दिसून येत आहे. त्यानंतर ती जडेजाला मिठी मारताना दिसून येत आहे.

या दोघांच्या बाजूला ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार देखील आहे. विजयचा जल्लोष साजरा करण्यासाठी उत्कर्षा धावत येते आणि ऋतुराजला मिठी मारते. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

लवकरच अडकडणार विवाह बंधनात..

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाड येत्या ३ किंवा ४ जूनला लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र त्याची होणारी पत्नी कोण? याबाबत त्याने कुठलाही खुलासा केला नाहीये. मात्र त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरून आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे की, ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवारच आहे.

लेटेस्ट फोटोशूट व्हायरल..

ऋतुराज गायकवाड हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने अनेकदा उत्कर्षा पवार सोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी ५० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

त्यावेळी उत्कर्षाने हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. हा सामना झाल्यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा फोटो शेअर केला होता.

नुकताच चेन्नई सुपर किंग्ज संघाने जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर, ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षाचा ट्रॉफी सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT