Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अजब लग्नाची गजब गोष्ट! नवरदेवाने स्वत:च घेतली भटजींची जागा; व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल...

Unique Wedding Video:सोशल मीडियावर सध्या एका लग्नाची मोठी चर्चा होत आहे.व्हायरल होत असलेल्या लग्नात चक्क नवरदेवाने भटजींची भुमिका नभावली आहे.नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Groom Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत.त्यातच लग्नाच्या मंडपातील अनेक अशा गोष्टी घडतात,ज्याची चर्चा सर्वत्र रंगते.आता अशाच एका लग्नात घडलेल्या गोष्टीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे,ज्यात नवरदेवाने चक्क भटजींची भूमिका निभावली आहे.

लग्नकार्य असो वा अन्य कोणताही कार्यक्रम यांमध्ये प्रमुख भुमिका ही भटजींची असते. भटजींच्या मार्गदर्शानाशिवाय कार्यक्रमाची सुरुवात ते पूर्ण कार्यक्रम अपूर्ण असतो.मुख्य म्हणजे लग्न कार्यात भटजींनी सांगितलेल्या विधींशिवाय पूर्ण लग्नाला महत्त्व प्राप्त होत नाही,मात्र सध्या व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओतील लग्नात चक्क नवरदेवानेच लग्नातील मंत्र म्हणतं लग्नकार्य उरकले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,लग्नकार्य सुरु असताना नवरदेव आणि नवरी लग्नातील विधी करत आहेत.मात्र,लग्नातील विधी हे चक्क नवरदेव स्वत:हा म्हणतं आहे आणि सर्व मंडली बाजूला बसलेली आहे.जर नीट पाहिले तर लग्नात भटजी दिसत नाहीत.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) उत्तर प्रदेशमधील असल्याचे समजत आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही.तुम्हाला हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'genzdigest'या अकाउंटवर पाहता येईल.

टीप: लग्नातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Crisis: धुळ्यात SRPF जवानाला बेदम मराहाण, गॅस एजन्सीबाहेर नागरिकांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Summer Season Saree Designs: उन्हाळ्यात कोणती साडी नेसावी? हे 5 पॅटर्न ट्रेडिंगमध्ये

Saree Reuse Dress: लग्नसराई ते डेली वेअर, कपाटातल्या जुन्या साड्यांपासून शिवता येतील ७ नवे ट्रेंडी ड्रेस

LPG Gas Cylinder: कॉल करुन सिलेंडर बुक होत नाही? आत्ताच फॉलो करा या ४ स्टेप्स; बुकिंग करूनही न मिळाल्यास 'इथे' करा तक्रार

SCROLL FOR NEXT