Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली! धावत्या लोकलमध्ये पुन्हा तरुणांची स्टंटबाजी; धक्कादायक VIDEO व्हायरल

Stunt Viral Video: सोशल मीडियावर दोन तरुणांचा धावत्या लोकलमधून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत पुढे काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Young Boy Stunt Video: सोशल मीडियावर आपल्याला कायम तरुणाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हीच तरुणाई गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या संपूर्ण आहारी गेली आहे. कुठे धोकादायक स्टंट करणे असो वा कोणत्याही विषयावर रिल्स बनवणे असो. मग यामधून ही तरुणाई संकटाना सामोरी जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात मृत्यूला न घाबरता धावत्या लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंट करत आहे. सध्या या तरुणांचा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला स्टेशन प्लॅटफॉर्म दिसून येत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की दोन तरुण धावत्या लोकलच्या दरवाजात उभे आहेत. एक तरुण संपूर्ण लटकून प्लॅटफॉर्मवर स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरा तरुण फक्त धावत्या लोकलच्या दरवाजात उभा आहे. प्लॅटफॉर्मवरील अनेक प्रवाशी या तरुणांना पाहून हैराण झालेले दिसून येत आहे. मात्र तरुणांचा स्टंट(Stunt) व्हिडिओ धावत्या लोकलमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@mr_mahtab_1m'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला असून तब्बल हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र कमेट बॉक्समध्ये एकही प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेली नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT