Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: या दोघांनी तर गौतमीलाही मागे टाकलं; मरीन ड्राईव्हवर तरुणांचे लावणीवर ठुमके, पाहा VIDEO

Boys Dance On Lavani: मरिन ड्राईव्हवर तरुणांचा डान्स पाहण्यासाठी तेथे साऱ्यांनीच गर्दी केली होती.

Ruchika Jadhav

Viral Video News:

सबसे कातील म्हटलं की आता लगेचच ओठांवर गौतमी पाटील हे नाव येतं. आपल्या डान्सने गौतमीनं भल्याभल्यांना भुरळ घातलीये. गौतमीच्या डान्सचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. राज्यात गौतमीप्रमाणे डान्स करणारे अनेक कलाकार आहेत. मात्र गौतमीनंच आख्खं मार्केट जाम केलंय. अशात सोशल मीडियावर गौतमीलाही तोड मिळेल असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अनेक मुली लावणी शिकण्यासाठी वेगळा क्लास लावतात. लावणीतील अदा आणि स्टेप्स शिकून घेतात. अशात सोशल मीडियावर दोन मुलांचा लावणीवर जबरदस्त ताल धरलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की दोन्ही मुलं एका लावणीवर दिलखुलास होउन नाचतायत. डान्स करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ @Rajdancer या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय.

तरुणांनी चंद्रा ही लावणी सादर केली आहे. मरिन ड्रईव्ह परिसरात या तरुणांनी डान्स केलाय. म्युजीकसह या गाण्याचे बोल जसे आहेत अदगी तसेच दोघेही डान्स करतायत. तरुणांनी डान्स करताना त्यांच्यासमोर गौतमी पाटील देखील फिकी आहे असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. मरिन ड्राईव्हवर तरुणांचा डान्स पाहण्यासाठी तेथे साऱ्यांनीच गर्दी केली होती.

राज डान्सर या युजरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, "आपली कला सादर करण्यासाठी मरीन ड्राईव्ह खूप छान ठिकाण आहे. प्रत्येक कलाकाराला तिथे खूप छान प्रतिसाद देतात कलेचा आदर करतात. प्रत्येक रविवारी नक्की भेट द्या वेगवेगळ्या कला बघा आणि प्रत्येकचा आदर करा कलेला दाद द्या"

राजच्या या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, दादा तुझा डान्स पाहिला की पाहातच रहावासा वाटतो. राजचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर समजतं की, तो स्वत: एक डान्सर आहे. त्याच्या या अकाउंटवर लावणीसह अन्य डान्सचे देखील बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT