नोटांचा पाऊस  Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: 200 च्या नोटांचा पाऊस? नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी, काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Viral News: तुम्ही कधी पैशांचा पाऊस पाहिलाय का...? एका रस्त्यावर चक्क पैशांच्या नोटा लोक गोळा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...मात्र, खरंच पैशांचा पाऊस प़डला का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

नोटांचा पाऊस पडला तर त्या गोळा करायला कुणाला आवडणार नाहीत...पैसे हे सगळ्यांनाच हवेसे असतात...म्हणूनच पैसे पडताना दिसले आणि पैसे गोळा करायला गर्दी जमा झाली...बघा, कसे हे लोक पैसे गोळा करण्यासाठी धावाधाव करतायत...

मात्र, हे पैसे कुठून पडतायत...? हा पैशांचा पाऊस असल्याचा दावा करण्यात आलाय...फक्त पैसे खाली पडत असतानाचाच व्हिडिओ व्हायरल करून हा दावा केल्याने अनेकांना प्रश्न पडलाय...की खरंच पैशांचा पाऊस पडतो का...? पैशांचा पाऊस पडत नाही, हे सगळ्यांनाच माहित आहे...मग हे पैसे कुठून आले...? हा व्हिडिओ कुठला आहे...? हे पैसे खरे आहेत की खोटे...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

- पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा

-नोटा उडवणारा हा युट्यूबर उत्तर प्रदेशातील

- वाढदिवस असल्याने ब्रीजवरून त्याने नोटा उडवल्या

- 200 च्या नोटा जमा करण्यासाठी लोकांची गर्दी

युट्यूब असल्याने या तरुणाने लाईक्स आणि व्ह्यूज वाढावेत म्हणून त्यानं हा प्रकार केल्याचं बोललं जातंय...आधी त्याने बर्थडेचा केक कापला आणि त्यानंतर उड्डाणपुलावर चढून 200 रुपयांच्या नोटा उडवल्या...त्यामुळे आमच्या पडताळणीत पैशांचा पाऊस पडत असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT