A screenshot from the viral video falsely claiming that a capsule can convert water into petrol. Saam Tv
व्हायरल न्यूज

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...असाच एक व्हायरल व्हिडिओ आमच्या हाती लागलाय...एक कॅप्सूल टाकल्यानंतर पाण्याचं पेट्रोल होतं असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच अशी पेट्रोल कॅप्सूल आलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहिलात...या व्हिडिओत पेट्रोलच्या टाकीत पाणी आणि ही कॅप्सूल टाकल्यानंतर आपोआप पेट्रोल तयार होतं असं दाखवण्यात आलंय...पेट्रोल भरण्यासाठी आता पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही, असा दावा करण्यात आलाय...स्वस्तात ही कॅप्सूल असल्याने सगळ्यांना परवडणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच ही पेट्रोल कॅप्सूल मार्केटमध्ये आलीय का...? असे प्रश्न उपस्थित होतायत...

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल...फक्त एक कॅप्सूल टाकल्यावर पूर्ण पेट्रोल टँक फूल होत असल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलंय...विशेष म्हणजे पाण्यात पेट्रोल कॅप्सूल चालते का...? हाच मोठा सवाल उपस्थित होतोय...आणि हे समीकरण जुळत असेल तर पेट्रोलच्या गाड्या वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...काही वेबसाईट्स पाहिल्या...काही मॅकझिनमध्ये बातम्या आल्यायत का हेदेखील पाहिलं...पण, कुठेही असं काही सापडलं नाही...याबाबत आम्ही एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली...

पेट्रोल कॅप्सूल मार्केटमध्ये आलेली नाही

पाण्यात पेट्रोल कॅप्सूल टाकून गाडी चालणं अशक्य

व्हायरल व्हिडिओतील पेट्रोल कॅप्सूल AI निर्मित

पेट्रोल कॅप्सूलने पेट्रोल गाडीत टाकणं शक्य नाही

.हा व्हिडिओ एआय निर्मित आहे...सध्या काहीही एआयच्या माध्यमातून तयार केलं जातं...त्यामुळे पेट्रोलसाठी आता पेट्रोलची कॅप्सूल आल्याचं दाखवण्यात आलंय...मात्र, आता एका कॅप्सूलने पाण्याचं पेट्रोल होतं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

SCROLL FOR NEXT