Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पोलिसाच्या बायकोने भररस्त्यावर रिल केला, ट्रॅफिक जाम झालं; नवऱ्याची नोकरी गेली

Viral Video News: सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्याच्या मधोमध डान्स करणं या महिलेला आणि तिच्या पतीला अत्यंत महागात पडले आहे. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

viral dance video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, कधी कधी हे व्हिडिओ फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर काही जणांना त्यामुळे नोकरीही गमवावी लागू शकते. सध्या असाच एक प्रकार चंदीगडमध्ये घडला आहे. जिथे पत्नीच्या व्हायरल डान्स व्हिडिओमुळे वाहतूक कोंडी झाली आणि थेट पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पत्नी रस्त्यावर रील्स बनवताना दिसत आहे. हा डान्स रील्स रस्त्यावर शूट करत असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रासही सहन करावाा लागला. रस्त्याच्या मधोमध शूट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे.

हा रील्स व्हिडिओ समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि केलेल्या तपासात असे आढळले की, रस्त्यावर रील्स शूट करणारी ही महिला एका पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले.

हा व्हिडिओ (Video) सध्या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @IshaniKrishnaa या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी अनेक लाईक्स केलेले आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील अनेक यूजर्संनी कमेंट केली,''बिचाऱ्याला शिक्षा मिळाली'' तर काहींनी महिलेच्या अशा वागण्याचा संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT