Mumbai Local Train Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Train Video: अर्रर्र! मुंबई लोकलमध्ये महिला आणि किन्नरमध्ये जोरदार हाणामारी; एकमेंकीना धू धू धूतले

Women fight with Kinnara: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला आणि किन्नरमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे. पुढे नेमके काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

लोकांच्या जीवाची नाळ जिच्याशी जोडलेली आहे, ती म्हणजे मुंबई लोकल! दिवसाकाठी लाखो प्रवासी यामधून प्रवास करतात. काहींसाठी ही फक्त ट्रेन आहे, पण मुंबईकरांसाठी ही 'लाईफलाइन' आहे. मात्र या लाईफलाइनमध्ये अनेकदा काही विचित्र, धक्कादायक आणि वादग्रस्त घटना घडताना दिसतात. अशीच एक खळबळजनक घटना अलीकडे समोर आली असून, यात महिला आणि किन्नर यांच्यात थेट लोकलच्या डब्ब्यातच तुफान हाणामारी झाली.

घटना नेमकी काय घडली?

लोकलमध्ये(Mumbai Local) झालेल्या हाणामारीचे नेमके कारण नक्की समजू शकलेले नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला दिसते, लोकल ट्रेनमधील एका डब्ब्यातून एक महिला तिच्या मुलाला घेऊन उतरत असते. मात्र काही कारणास्तव त्याच डब्ब्यातील तृतीयपंथीशी तिचा वाद होतो आणि मग काही काही क्षणात दोघांमध्ये तुफान हाणामारी सुरु होते.

हा सगळा प्रकार लोकल डब्ब्यातील प्रवाशांपैकी काहींनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. बघता बघता तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mumbai_lif3 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून नक्की कोणत्या रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला ते अद्याप समजू शकलेले नाही.

हाणामारीची (Fighting )घटना आतापर्यंत इन्स्टाग्रा, एक्स(ट्वीटर), फेसबूक अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर करण्यात आलेली आहे. अनेकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला, तर काहींनी दोघींच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''काय बोलणार खाली गाडी असून पन भांडतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''लहान मुलाला अक्कल आहे पण व्हिडिओ बनवऱ्यांना आणि शेअर करणाऱ्यांना नाही'' अशा प्रकारे प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT