Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत तरुणाचा धम्माकेदार डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात मोठ्या संख्येने चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ एकदा तुम्हीही पाहाच.

Tanvi Pol

दिल्ली मेट्रोमध्ये एका तरुणाने केलेल्या बिनधास्त डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गर्दीने भरलेल्या मेट्रो कोचमध्ये अचानक एका तरुणाने मोबाईलवर गाणं लावून नाचायला सुरुवात केली. त्याचा हा अनपेक्षित डान्स पाहून काही प्रवासी चकित झाले, काहींनी डोकं हलवलं, तर काहींनी त्याच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसत असून अनेक महिला यातून प्रवास करत असतात. त्यातच अचानक एक व्यक्ती मेट्रोमध्ये चढतो आणि काही वेळाने डान्स करु लागतो. प्रवास करत असताना अचानक व्यक्तीचा आगळा वेगळा डान्स पाहून प्रत्येकजण गोंधळात आलेला आहे आणि हा डान्स व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत असलेल्याने मोबाईलमध्ये शूट केला आहे.

हा व्हिडिओ(Video) फेसबूक, इन्स्टाग्राम या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करण्यात आलेला असून सध्या इन्स्टाच्या sanju.jai.18 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. डान्स करत असलेल्या व्यक्तीला पाहून नेटकऱ्यांच्या व्हिडिओ मोठ्या पंसतील आलेला असून आतापर्यंत हजारो लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले आहेत. शिवाय हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी आपली विविध मते व्यक्त केली आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''असा आत्मविश्वास सर्वांकडे पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कमाल डान्स केला'' शिवाय तिसऱ्या यूजरने म्हटलं आहे,''चला काही तरी वेगळा विषय आहे दिल्ली मेट्रोमधला'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT