Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मोमोजसाठी भररस्त्यात तरुणी भिडल्या; एकमेकींना झिंझ्या उपटत जमिनीवर आपटले; व्हिडिओ व्हायरल

Girls Fighting Video: तरुणींचे वाद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. पण अनेकदा या हाणामारीचे कारण ऐकून प्रत्येकजण हैराण होतो. सध्याही अशाच काही तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Girl brawl street: मोमोजवरून झालेली मारामारी तुफान चर्चेत आहे. काही तरुणींमध्ये भररस्त्यात वाद झाला, जो शेवटी धक्काबुक्की आणि मारामारीमध्ये बदलला. हे सर्व एका मोमोजच्या स्टॉलवर घडले,

मोमोजच्या वादामुळे तरुणींमध्ये धुमाकूळ

घडले असे की, प्रत्येक सायंकाळी या ठिकाणी मोमोजसाठी अनेक युवक-युवती येत असतात. दरम्यान त्या दिवशीही मोमोज ऑर्डरवरून दोन तरुणींमध्ये वाद झाला. सुरुवातीला हा वाद फक्त शाब्दिक होता. पण पाहता पाहता हा वाद थेट ढकलाढकली पर्यंत असतो. पण नंतर हाणामारी(Fighting) तरुणींमध्ये होते. तरुणी यावर थांबत नाही तर एकमेंकीचे केस ओढण आणि कानशिलात लगावणे हे सुरु झाले. वेळेवर परिसरातील नागरिकांनी दोघींनी शांत केले आणि हा वाद मिटला जातो.

सर्व हाणामारीची घटना जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आहे आणि काही वेळातच सोशल मीडियावरही अपलोड केली. क्षणात हा व्हिडिओ तुफान व्हायरलही झाला शिवाय आता नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. बऱ्याच जणांनी ही घटना विनोदी म्हणून शेअर केली, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''पोरींच कधीच काही सांगता येत नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आम्हीपण तिथे हाणामारी पाहण्यासाठी पाहिजे होतो'' तर अनेकांनी ''तरुणींच्या अशा वागण्याचा संताप केला आहे'' अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Trendy Blouse Design: सिंपल अन् फॅन्सी साडीवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज डिझाईन्स, महिलांनो नक्की ट्राय करा

Flamingo Season: गुलाबी थंडीत फ्लेमिंगो पाहायला जा; हे आहे नवी मुंबईजवळ सुंदर लोकेशन

Akshaye Khanna Dhurandhar : १,२,३ नव्हे अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या ७ वेळा थोबाडीत मारली, नेमकं झालं काय?

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Viral Video : महिला शिक्षिका OYO मध्ये बॉयफ्रेंडसोबत गेली, नवऱ्याने रंगेहात पकडले, अन्.. पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT