Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रेनमध्ये महिलांचा राडा! झिंज्या पकडत तुंबळ हाणामारी; व्हायरल VIDEO चर्चेत

Fighting Video: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.ज्यात महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.ट्रेनमध्ये महिलांची हाणामारी काय झाली ते एकदा व्हिडिओ पाहून समजेल.

Tanvi Pol

Women Fighting Video: जगभरात करोडो प्रवासी ट्रेनची निवड प्रवासासाठी करत असतात.ट्रेनचा प्रवास जलद आणि अगदी आरामदायी मानला जातो.मात्र गेल्या काही वर्षापासून प्रवासी संख्येत वाढ झाल्याने ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.गर्दीतून प्रवास करताना अनेक क्षुल्लक गोष्टींवरुन प्रवाशांमध्ये वाद होतो आणि हे वाद लगेच मिटतात देखील,मात्र सध्या अशाच एका ट्रेनमध्ये महिलांमध्ये वाद झाला मात्र हा वाद अत्यंत टोकाला जाऊन दोघींमध्ये जोरदार हाणामारी होते.सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर आजवर महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल झाले आहेत.जास्तीत जास्त व्हिडिओहे मुंबई लोकलमधील असतात ज्यात सीटच्या कारणांवरून काही महिला एकमेंकीसोबत भिडतात.सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार मारामारीह होताना दिसत आहे.सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला ट्रेनमधील आतील डब्बा दिसत आहे.ज्या डब्ब्यात प्रवाशांची खचाखच गर्दी दिसून येत आहे.मात्र अशात डब्ब्यात असलेल्या दोन महिलांमध्ये वाद सुरु होतो.काही केल्या हा वाद थांबत नाही आणि शेवटी या वादाचे रुपांतर तुफान हाणामारीमध्ये होते.सर्व व्हिडिओ ट्रेनमधील असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

महिलांच्या हाणामारीचा(Fighting) व्हिडिओ 'tuzya_mazya_premachi_bharari' या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या ट्रेनमधील आणि कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नही,मात्र सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे.विशेष म्हणजे एका यूजरने कमेट केली आहे,''आता ऐवढी मारामारी करायची गरज काय''तर अनेक यूजर्संनी कमेट केली आहे,''बायका नाही ऐकत'',अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत.

टीप : महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : मध्यरात्री घरात घुसला, तलवारीच्या धाकात अल्पवयीन तरुणीला पळवलं, अन्... नागपुरात भयकंर घडलं!

Sambhajinagar : पाय घसरल्याने नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; नदीकाठी जनावरे चारताना दुर्दैवी घटना

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग आत्ताच जाणून घ्या

GK: कोणत्या देशात Gen Z ची सर्वाधिक लोकसंख्या आहे? जाणून घ्या आकडेवारी

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT