Viral Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: तृतीयपंथीचा ट्रेनमध्ये कल्ला! मराठी गाण्यावर धरला ठेका; मुंबई लोकलमधील व्हिडिओ एकदा पाहाच

Mumbai Local Train Video: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. नेमके काय घडले व्हिडिओत ते पाहा.

Tanvi Pol

Transgender dance Mumbai local: मुंबई लोकल ही केवळ प्रवासाचे साधन नाही, तर रोजच्या धकाधकीच्या जीवनातील अनेक हसरे-रडवे क्षण इथे घडतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तृतीयपंथी महिलेने लोकल ट्रेनमध्ये मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मुंबई(Mumbai Local) एसी लोकल दिलून येत आहे. ट्रेनमध्ये प्रवाशीची मोठी गर्दी आहे. ज्यात लहान मुलांपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा समावेश आहे. तेवढ्यात या लोकलच्या डब्ब्याक मराठी गाणं वाजण्यास सुरुवात होते. ज्यावर सर्वांसमोर एक तृतीयपंथी महिला डान्स करण्यासाठी येते. पारंपरिक साडी नेसलेली असून, गळ्यात विविध माळा परिधान करुन या डान्स करत असतात.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संजू रोठाचे नवीन प्रसिद्ध गाणं ''शेकी शेकी'' या गाण्याच्या बीटवर थिरकणाऱ्या या महिलेचा आत्मविश्वास, उत्साह आणि आनंद पाहून प्रवासीही भारावून गेले होते. डब्ब्यातील कोणी टाळ्या वाजवल्या, तर कोणी मोबाईलमध्ये तो क्षण कैद केला. काही प्रवाशांनी त्या डान्सचा आनंद घेत चांगला प्रतिसाद दिला होता असे सर्व व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील arpanajuvekarmehta या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून या व्हिडिओला(VIDEO) काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत. तसेच हा व्हिडिओ फेसबूक, ट्वीटरवरही जोरदार व्हायरल झालेला आहे. डान्स पाहिल्यानंतर अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT