Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: संजू राठोडच्या नव्या गाण्यावर काकूंची झकास अदा; डान्स करताना पाहून नेटकरी घायाळ; पाहा व्हिडिओ

Stylish Aunty Dance: सोशल मीडियावर बऱ्याचदा अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याच सध्या एका डान्सच्या व्हिडिओची तुफान चर्चा होत आहे. डान्स कोणी केला आहे ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Aunty's Dance Video: सध्या सोशल मीडिया माध्यमांवर एक भन्नाट व्हिडिओ जबरदस्त गाजतोय. प्रसिद्ध गायक संजू राठोडच्या नव्या गाण्यावर एका काकूंनी तुफान असा डान्स केला की, नेटकऱ्यांच्या नजराच हटेनात शिवाय त्यांच्या अदा, स्टाइल आणि जबरदस्त एनर्जीने सर्वांनाच घायाळ केलं आहे. या व्हिडिओमुळे त्या काकू रातोरात सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत.

प्रसिद्ध गायक संजू राठोड याचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. बऱ्याच लोकांनी त्या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ(Dance Video) सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे या एका स्टायलिश काकूंच्या डान्स परफॉर्मन्सने. त्यांच्या डान्स स्टेप्स, कॉन्फिडन्स आणि चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ एक महिला घरातच डान्स करताना दिसत आहे. या महिलेने पोपट्या रंगाची साडी नेसलेली आहे. डोळ्यांवर स्टायलिश गॉगल घातलेला आहे. त्यानंतर गाणं वाजल्यानंतर काकू असा डान्स करण्यास सुरुवात करतात, जो प्रत्येकजण पाहतच राहिल.

काकूंचा हा डान्स(Dance) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. तो इन्स्टाग्रामवरील shilpaprabhukar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत लाखोंचे लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत याला. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कमालीचा उत्साह आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''एनर्जीचा पाऊस'' अशा प्रकारे कौतुकास्पद प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT