Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बॉक्सर स्वीटी बूराने नवऱ्याला धू-धू धुतला! पोलिस ठाण्यातील व्हिडिओ आला समोर; प्रकरण तरी नेमके काय?

Saweety Boora And Deepak Hooda Fight: सध्या सोशल मीडियावर एका जोडप्यांची जोरदार चर्चा होत आहे. ज्यामध्ये दोघांच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रकरण नेमके काय ते एकदा पाहा.

Tanvi Pol

वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा आणि भारताचा माजी कबड्डीपटू दीपक हुड्डा यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात आता एका नव्या व्हिडिओची भर पडली आहे, ज्यामध्ये स्वीटी बूरा चक्क पोलिस ठाण्यातच दीपक हुड्डाला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून या प्रकरणी पोलिसांनी स्वीटी बूरावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

आता या भांडणाचा व्हिडिओ समोर आला

व्हायरल (Viral) होत असलेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य पोलिस ठाण्यात बसलेले दिसत आहे. काही वेळात स्वीटी बूरा आणि दीपक हुड्डा यांच्यामध्ये वाद सुरु होतो. पाहचा पाहता क्षणिकच स्वीटी बूरा खुर्चीवर उठते आणि दीपक हुड्डाचा गळा पकडते आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात करते. तीला शांत करण्यासाठी तिथे दोन महिला गेलेल्या व्हिडिओत दिसत आहे. पोलिस ठाण्यातील सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून @ians_india या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांकडून अनेक चर्चा होत असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

नेमका वाद कशाचा?

हिसार येथील रहिवासी आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सर स्वीटी बूराचे पतीसोबत वाद (Argument) सुरू आहेत. तिने पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केलेला आहे. मात्र त्यानंतर हिसार महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन्ही पक्षांची चौकशीही करण्यात आली.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

IAS Transfer: तुकाराम मुंढेंची २१ वर्षांत २५ वेळा बदली, आता कुठे करण्यात आली नियुक्ती?

पुण्यासह विविध जिल्ह्यात पुढील ३ तासांत पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट', video

psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

SCROLL FOR NEXT