Mock Drill Saam Tv
व्हायरल न्यूज

Mock Drill: सायरन वाजताच काय कराल?मॉक ड्रिल संदर्भात केंद्राने जारी केला व्हिडिओ

Pahalgam Terror Attack: सोशल मीडियावरील विविध माध्यमांवर मॉक ड्रिल हा शब्द पाहण्यासाठी मिळत आहे. ; मॉक ड्रिल म्हणजे काय ते सर्वांना माहिती पडले आहे, पण सायरन वाजताच कार करावे त्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

India Pakistan war Mock Drill: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडेच पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या पाश पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल, म्हणजेच आपत्ती आणि दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितीचा सराव आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हिडिओत नेमके काय आहे?

व्हिडिओत(VIDEO) सांगितले आहे की, नेहमी प्रमाणे एका घरातील सदस्य एकत्र येत जेवण करत आहेत. शहरातील रस्त्या-रस्त्यांवर लहान मुलं खेळत आहेत. बाजारपेठांमध्ये नागरिकांची खरेदीसाठी गर्दी आहे. सर्व काही अगदी आनदांने सुरु आहे. पण जेव्हा सायरन वाजतो आणि सर्व वातावरण क्षणार्धात बदलेत.

सायरन ऐकू येताच विलंब न करता पावले उचला

व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा घरात असाल तर, पंखे, दिवे आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करावीत. सर्व पडदे आणि खिडक्या बंद करुन घ्या, कारण अगदी थोडासा प्रकाश सुद्धा शत्रुला संकते देऊ शकतो.

हा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया(MEDIA) प्लॅटफॉर्मवरील@MIB_Hindi या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. हे ट्वीटर पेज 'माहिती आणि प्रसारण मंत्रालय' चे आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नागरिकांच्या मदतीस आलेला आहे आणि त्यातून अनेकांनी स्वता:चा बचाव कसा करावा हे समजले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT