Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबई लोकलमध्ये झाला फिल्मी ड्रामा! ट्रेनच्या बाहेर थांबत पतीने पत्नीसाठी केलं असं काही; पाहा VIDEO

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही, त्यातच मुंबई शहरातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात असे काही घडते ते पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

Tanvi Pol

Husband Wife Drama Train: मुंबई लोकल सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. इथं रोज लाखो प्रवासी एकमेकांना सांभाळत पुढे जाण्याची धडपज करतात. मात्र, या धावपळीच्या प्रवासात अनेकदा काही क्षण घडतात, की डब्ब्यातील लोक डोक्याला हात मारतात किंवा एकमेंकाकडे पाहत हसतात.

सध्या मुंबई (Mumbai Local) लोकलमध्ये असाच एक प्रसंग घडला आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती रेल्वे रुळाच्या बाजूला अगदी धावत्या ट्रेनच्या बाजूला उभा आहे. ट्रेन आल्यानंतर तो व्यक्ती महिलांच्या डब्ब्यांजवळ जातो आणि त्या डब्ब्यात असलेल्या त्याच्या पत्नीला त्याच्याकडची बॅग देतो आणि स्वत:नंतर दुसऱ्या डब्ब्यात चढतो. व्यक्तीचा हा प्रताप लांबून एका प्रवासाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडिओ (Video) काही तासांत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर अनेक लोकांनी हा प्रसंग पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया केल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,'' शूटिंग करताना मला कधीच वाटलं नव्हतं की असं होईल'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मुंबईतील एका सामान्य रहिवाशाला दररोज ज्या परिस्थितीतून जावे लागते ते अत्यंत धोकादायक आणि दुःखद आहे'' शिवाय अनेकांनी व्यक्तीच्या अशा कृतीवर संताप व्यक्त केला आहे.

फक्त काही तासांत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळालेले आहेत शिवाय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील vaibhav_ki_mandali या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. इन्स्टाग्राम नाही तर फेसबूक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT